सुरेश रैनाच्या जागी इंग्लंडच्या डेव्हिड मलानला चेन्नईचा संघ संधी देण्याचा विचार करत आहे. पण मलानला संघात घेण्यासाठी आता एक मोठी अडचण चेन्नईच्या संघापुढे असल्याचे म्हटले जात आहे. चेन्नईच्या संघासमोर नेमकी कोणती समस्या आहे. पाहा…

सुरुवातीला रैनाच्या जागी संघात कोणालाही संधी द्यायची नाही, असे चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाने कळवले होते. पण जर रैना खेळणार नसेल तर त्याच्याजागी संघात खेळाडू हवा, हा निर्णय आता चेन्नईच्या संघाने घेतला आहे. रैनाच्या जागी ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या इंग्लंडच्या डेव्हिड मलानला चेन्नईचा संघ संधी देण्याचा विचार करत होती. पण आता त्यांच्यापुढे एक मोठी समस्या आली आहे.

याबाबत चेन्नईच्या संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांनी सांगितले की, ” मलानला चेन्नईच्या संघात घेण्यापूर्वी काही नियमांना पाहावे लागेल. या नियमांमुळेच मलानला संघात स्थान देण्यासाठी अडचण येत आहे. एका संघात आठ परदेशी आणि १७ भारतीय, असे २५ खेळाडू यावर्षीच्या आयपीएलमध्ये असू शकतात. या नियमामुळे आम्ही मलानला संघात स्थान देऊ शकत नाही. कारण सध्याच्या घडीला संघात शेन वॉटसन, ड्वेन ब्राव्हो, लुंगी एनगिडी, इम्रान ताहिर, जोश हेझलवूड, मिचेल सँटनर, फॅफ ड्यू प्लेसिस आणि सॅम कुरन असे आठ परदेशी खेळाडू आहेत. त्यामुळे मलानला आम्ही संघात सामील करून घेऊ शकत नाही.”

वाचा-

विश्वनाथ यांनी पुढे सांगितले की, ” सध्याच्या घडीला संघातील परदेशी खेळाडूंचा कोटा पूर्ण भरलेला आहे. पण जर या परदेशी खेळाडूपैकी कोणी माघार घेतली तर मलानचा विचार केला जाऊ शकतो. पण सध्याच्या घडीला तरी हे सर्व खेळाडू खेळणार असल्याचेच समजते आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी आम्ही मलानला संघात घेऊ शकत नाही.”

वाचा-

मलान हा ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत ८७७ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. मलान हा मधल्या फळीत येऊन धडाकेबाज खेळी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. रैनाही मधल्या फळीत येऊन फलंदाजी करायचा. त्यामुळे मलान हा रैनासाठी योग्य पर्याय असल्याचे चेन्नईच्या संघाला वाटत होता. त्यामुळे चेन्नईचा संघ सध्याच्या घडीला मलानबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजत होते. पण चेन्नईच्या संघाचा परेदशी खेळाडूंचा कोटा आता पूर्ण झाल्याचे समजत आहे. त्यामुळे मलानला संघात कसे घ्यायचे, याचा विचार चेन्नईचा संघ करत असेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here