मुंबईचा संघ दिवसा जास्त सराव करत असल्याचे पाहायला मिळत नाही. युएईमध्ये दिवसा जास्त गरम होत असल्यामुळे सराव करायचा समस्या जाणवत आहे. त्यामुळे मुंबईचा संघ संध्याकाळी किंवा रात्री सराव करायला पसंती देतो. मुंबईचा संघ असाच रात्री सराव करत असताना रोहितने मारलेला चेंडू थेट मैदानाबाहेर गेल्याचे पाहायला मिळाले.
फलंदाजीचा सराव करत असताना रोहित चांगलाच घाम गाळत आहेत. एका व्हिडीओमध्ये रोहितने चेंडूवर कडक प्रहार केल्याचे पाहायला मिळत आहे. हा चेंडू थेट मैदानाबाहेर जात असलेल्या बसला लागत असल्याचे दिसत आहे. रोहितचा हा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.
मुंबई इंडियन्सचे या आपीएलमध्ये असतील असे सामने…19 सप्टेंबर – शनिवार – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
23 सप्टेंबर, बुधवार – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
28 सप्टेंबर, सोमवार – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
1 ऑक्टोबर, गुरुवार – किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
4 ऑक्टोबर, रविवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दुपारी 3.30 वाजल्यापासून, शारजा
6 ऑक्टोबर, मंगळवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
11 ऑक्टोबर, रविवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
16 ऑक्टोबर, शुक्रवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
18 ऑक्टोबर, रविवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
23 ऑक्टोबर, शुक्रवार – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजा
25 ऑक्टोबर, रविवार – राजस्थान ऱॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
28 ऑक्टोबर, बुधवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
31 ऑक्टोबर, शनिवार – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई
3 नोव्हेंबर, मंगळवार – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजा
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times