आतापर्यंत आयपीएलमध्ये अमेरिकेचा एकही क्रिकेटपटू खेळलेला नव्हता. पण यावर्षीच्या आयीएलच्या हंगामात पहिल्यांदाच अमेरिकेचा एक खेळाडू पाहायला मिळणार आहे. आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून हा अमेरिकेचा खेळाडू खेळणार आहे. हा खेळाडू आहे तरी कोण, पाहा…

वाचा-

कोलाकाच्या संघातील हर्नी गुर्ने या वेगवान गोलंदाजाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो यावर्षी आयपीएल खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. हर्नीच्या जागी आता अमेरिकेच्या या वेगवान गोलंदाजाला संघात स्थान देण्यात आले आहे. अमेरिकेध्येही क्रिकेटचा चांगला प्रसार करण्यात आला आहे. पण अमेरिकेचा एकही खेळाडू आतापर्यंत आयपीएलमध्ये पाहायला मिळाला नव्हता.

वाचा-

कोण आहे हा अमेरिकेचा खेळाडूआयपीएलमध्ये खेळणारा अमेरिकेचा पहिला खेळाडू आहे तरी कोण, याची उत्सुकता तुम्हाला लागलेली असेल. अमेरिकेचा वेगवान गोलंदाज अली खान हा यावर्षी आयपीएलमध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अलीने चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोखाली, आता आपण दुबईला येत आहोत, असे त्याने म्हटले आहे.

अलीची संघात कशी झाली निवडअली हा कॅरेबियन प्रीमिएर लीगमध्ये त्रिनबागो नाइट राइडर्स या संघातून खेळत होता. त्रिनबागो नाइट राइडर्स या संघाने यावेळी स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. त्रिनबागो नाइट राइडर्स आणि कोलकाता नाइट रायडर्स या दोन्ही संघांचा मालक हा शाहरुख खान आहे. कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर अलीला कोलकाता नाइट रायडर्स संघात स्थान देण्यात आले आहे.

वाचा-

पाकिस्तानमधील पंजाब येथे अलीचा जन्म झाला होता. पण अली जेव्हा १८ वर्षांता होता तेव्हा तो आपल्या पालकांबरोबर अमेरिकेला रवाना झाला होता. अली हा एक वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे यावर्षी तो कोलकात्याच्या संघातील सरप्राइज पॅकेज ठरू शकेल, असे म्हटले जात आहे. वेगवान गोलंदाजीसाठी अली हा ओळखला जातो. त्याचबरोबर अली हा भन्नाट यॉर्कर टाकतो, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे यावर्षीच्या आयपीएलमध्ये अली संधी मिळणार का आणि तो या संधीचे सोने करणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेले असेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here