भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगला क्रिकेटमधलं एक रहस्य समजलेले आहे. आपण लवकरच हे रहस्य उलगणार असल्याचे हरभजनने म्हटले आहे. हरभजनने एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्याने आपल्याला क्रिकेटमधलं एक रहस्य समजलं आहे आणि त्याला खुलासा आपण लवकरच करणार असल्याचे त्याने सांगितले आहे.

वाचा-

सध्याच्या घडीला हरभजन भारतामध्येच आहे. यावर्षी आयपीएल न खेळण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. त्यामुळे यावर्षी चेन्नईच्या संघातून आयपीएल खेळताना हरभजन आपल्याला दिसणार नाही. पण हरभजन भारतामध्ये असला तरी त्याला एक रहस्य आता समजलेले आहे. हे रहस्य नेमके आहे तरी काय, याची उत्सुकता आता चाहत्यांना लागलेली आहे.

वाचा-

हरभजनने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ” क्रिकेट आजकाल चांगलेच चर्चेत आले आहे. क्रिकेटची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. मला आता एक गोष्ट समजली आहे की, ज्यामुळे क्रिकेटकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोन बदलू शकतो. त्याचबरोबर क्रिकेटचा खुलासा, असा हॅशटॅगही त्याने वापरलेला आहे.”

हरभजनने हे ट्विट चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. हरभजनच्या या ट्विटवर काही जणांनी प्रश्नही विचारले आहेत. हरभजन मॅच फिक्सिंग, एखादा गैरव्यवहार, चोरी, भ्रष्टाचार, राजकीय पक्ष, यापैकी नेमकं कशाबद्दल तु बोलत आहेस, असा प्रश्न एका चाहत्याने विचारला आहे. त्यामुळे हरभजनकडे नेमके कोणते रहस्य आहे आणि तो हे रहस्य कधी उलगडणार आहे, याची उत्सुकता आता चाहत्यांना आहे.

वाचा-

हरभजनच्या या ट्विटवरून काही गोष्टींचा अंदाज आता चाहते बांधत आहेत. हरभजन हा यावर्षी होणाऱ्या आयपीएलबद्दल काही रहस्य सांगणार असल्याचे काही जणांना वाटत आहे. पण हरभजन आयपीएल खेळत नसताना किंवा आयपीएलसाठी युएईला गेला नसताना तो नेमका कोणता खुलासा करू शकतो, याचा विचारही चाहते करताना दिसत आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here