आयपीएलच्या १३व्या हंगामात विराट विजेतेपदासाठी नक्कीच लढत देईल. युएईला पोहोचल्यापासून विराट आणि त्याचा संघ अन्य संघांप्रमाणे जोरदार तयारी करत आहे. RCBच्या सरावाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विराट स्वत: त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.
वाचा-
अशातच रविवारी सकाळी विराटने एक ट्विट पोस्ट केले. विराटचे ही पोस्ट सर्व क्रिकेटपटू आणि चाहते यांची उत्सुकता वाढवणारी ठरली आहे. विराटने ही पोस्ट करिअर संदर्भात केली आहे.
वाचा-
विराटने केलेल्या ट्विट पोस्टमध्ये तो म्हणतो की, करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी ….. ची गरज असते. रिकाम्या जागा भरा. थोडी क्रियेटिव्हपणा दाखवा.
विराटच्या या ट्विटवर अनेक जण उत्तर देत आहेत. फक्त दोन तासात १० हजार जणांनी त्यावर उत्तर दिले आहे. तर चार हजार जणांनी विराटचे ट्विट रिट्विट केले आहे. या पोस्टला जवळपास ३५ हजार जणांनी लाइक केले आहे. विराटने हे ट्विट करताना #ViratOnCareers असा हॅशटॅग वापरला आहे. जो सध्या भारतात ट्रेडिंगमध्ये आहे.
विराट कोहलीने आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराटच्या नावावर १७७ सामन्यात ५ हजार ४१२ धावांची नोंद आहे. त्याने आरसीबीला अनेक सामन्यात विजय मिळवून दिला असला तरी अद्याप आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नाही.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times