आता ३७ वर्षीय पुन्हा एकदा मैदानावर खेळताना दिसणार आहे. केरळ राज्य क्रिकेट संघटनेने त्याला पुन्हा एकदा रणजी संघात घेणार असल्याचे काही महिन्यांपूर्वी सांगितले होते. जर फिटनेस सिद्ध केला तर श्रीसंतला पुन्हा संधी मिळू शकेल.
बंदीचा कालावधी संपण्याआधी श्रीसंतने शुक्रवारी एक ट्विट केले होते. मी आता कोणत्याही प्रकारच्या आरोपापासून मुक्त आहे. जो खेळ मला सर्वात आवडतो त्याचे प्रतिनिधित्व करणार. मी प्रत्येक चेंडू टाकताना सर्वोत्तम प्रयत्न करेन. मग तो सराव असला तरी. माझ्याकडे जास्ती जास्त पाच ते सात वर्षाचा कालावधी आहे. ज्या संघाकडून खेळेन त्याच्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करेन, असे श्रीसंत म्हणाला.
भारतात देशांतर्गत क्रिकेट ऑगस्ट महिन्यात सुरू होते. पण करोनामुळे क्रिकेट सामने स्थगित करण्यात आले आहेत. २०१३च्या आयपीएलमध्ये झालेल्या कथित स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्यात आली होती. गेल्या वर्षी भारतीय क्रिकेट बोर्डाच्या लोकपालने त्याच्यावरील बंदीचा कालावधी कमी करत तो सात वर्षाचा इतका केला होता. २०१३ साली श्रीसंतसह अजीत चंडीला आणि अंकित चौहनावर देखील बंदी घालण्यात आली होती.
श्रीसंतने भारतासाठी २७ कसोटी, ५३ वनडे आणि १० टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ८७, वनडेत ७५ आणि टी-२०मध्ये ७ विकेट घेतल्या आहेत.
देशात करोना व्हायरसमुळे सर्व स्थानिक क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी श्रीसंतला थोडी वाट पाहावी लागले. केरळच्या रणजी संघात त्याची निवड झाल्यानंतर स्वत:ची बिघडलेली प्रतिमा सुधारण्याची संधी आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times