नवी दिल्ली: भारतीय बॅडमिंटनचा आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण करणारे प्रशिक्षक कधीच स्वत:च्या भावना सर्वांसमोर सांगत नाहीत. भारताच्या एकेकाळच्या आघाडीच्या खेळाडूने त्यांचे सर्वात मोठे दु:ख सांगितले आहे.

देशात बॅडमिंटनला लोकप्रियता मिळवून देणाऱ्या सायना नेहवालचे करिअर घडवण्यामध्ये गोपीचंद यांचा मोठा वाटा आहे. पण जेव्हा सायनाने गोपीचंद यांची अकादमी सोडून यांच्या अकादमीत प्रशिक्षणासाठी गेली तेव्हा दु:ख झाल्याचे गोपीचंद यांनी सांगितले. सायनाचे असे सोडून जाण्याने आपल्याला दु:ख झाल्याचे गोपीचंद यांनी म्हटले. इतक नव्हे तर भारताचे पहिला सुपरस्टार पडुकोण कधीच आपल्याबद्दल सकारात्मक बोलले नसल्याची खंत देखील गोपीचंद यांनी व्यक्त केली.

गोपीचंद यांनी ”या आगामी पुस्तकात आयुष्यातील कठीण काळाबद्दल लिहले आहे. विशेष म्हणजे सायना नेहवालचा पती आणि राष्ट्रकूल सुवर्णपदक विजेता पारूपल्ली कश्यप याने या पुस्तकाचे सहलेखन केले आहे.

पुस्तकातील ‘Bitter Rivalry’या प्रकरणात २०१४मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेनंतर सायनाने पडुकोण यांची बेंगळूरू येथील अकादमीत प्रवेश केला. माझ्याकडील सर्वात प्रिय गोष्ट दूर जात असल्यासारखी ती भावना होती. सायनाने अकादमी सोडून जाऊ नये यासाठी मी खुप समजावले. पण ती दुसऱ्यांच्या प्रभावाखाली होती आणि तिचा निर्णय आधीच झाला होता. त्यामुळे मी नंतर फार जोर दिला नाही, असे गोपीचंद यांनी पुस्तकात म्हटले आहे.

वाचा-

गोपीचंद पी.व्ही.सिंधूवर अधिक लक्ष देत असल्यामुळे सायनाने त्यांची अकादमी सोडल्याची चर्चा तेव्हा होती.

या चर्चाबद्दल गोपीचंद लिहितात, होय मी अन्य खेळाडूंकडे लक्ष देत होतो. त्यात सिंधूने २०१२ ते २०१४ या काळात फार चांगली प्रगती केली होती. पण मी कधीच सायनाकडे दुर्लक्ष केले नाही. कदाचीत मी ही गोष्ट तिला समजावू शकलो नाही.

पडुकोण यांनी सायनाला हैदराबाद सोडण्यास प्रोत्साहन दिले. माझ्यासाठी हे एक मोठ कोडंच आहे की प्रकाश सर कधीच माझ्याबद्दल सकारात्मक का बोलले नाहीत. मी नेहमची त्यांना माझा रोल मॉडेल म्हणून पाहिल्याचे, गोपिचंद म्हणतात.

वाचा-

रिओ ऑलिम्पिक २०१६मध्ये सायनाचा पहिल्या काही फेरीतच पराभव झाला. त्यानंतर दिला दुखापतीला सामोरे जावे लागले. २०१७मध्ये सायनाने वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यानंतर पुन्हा एकदा तिच्या पहिल्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली होती.

गोपीचंद यांच्या पुस्तकाचे येत्या २० जानेवारी रोजी प्रकाशन होणार आहे.

हे देखील वाचा-

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here