दुबई: चेन्नई सुपर किंग्जचा संघ या वर्षी आयपीएलमध्ये दोन स्टार खेळाडूंशिवाय खेळणार आहे. उपकर्णधार सुरेश रैना आणि फिरकीपटू हरभजन सिंग या दोघांनी वैयक्तीक कारणामुळे माघार घेतली आहे. हे दोन खेळाडू संघात नसल्यामुळे चेन्नईच्या कामगिरीवर काय परिणाम होणार आहे ते येणाऱ्या काही दिवसात समजेलच. पण सध्या सीएसकेचा संघ धोनीच्या नेतृत्वाखाली जोरदार सराव करत आहे.

वाचा-
वाचा-

चेन्नई संघाच्या सरावाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवासांपूर्वी धोनीने मारलेला चेंडू मैदानाबाहेर गेला होता. आता चेन्नई संघाने महेंद्र सिंह धोनी आणि यांच्या सरावाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हे दोघेही चेन्नईचे स्टार खेळाडू आहेत.

वाचा-
धोनी आणि वॉट्सन यांनी मैदानावरील सरावा दरम्यान स्फोटक फलंदाजी केली आहे. या व्हिडिओमध्ये दोघांची फलंदाजी पाहिल्यानंतर स्पर्धेत मोठी खेळी पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटू नये.

वाचा-

गेल्या वर्षी वॉट्सनने अंतिम सामन्यात ८० धावांची खेळी केली होती. पण अखेरच्या षटकात तो बाद झाला आणि चेन्नईचा एक धावाने पराभव झाला. या वर्षी देखील धोनी फलंदाजीच्या जोरावर संघाला विजेतेपद मिळून देण्याचा प्रयत्न करेल.

वाचा-
आयपीएलच्या निमित्ताने धोनी जवळपास दीड वर्षानंतर मैदानात परतणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार असून या दोघांनी अनुक्रमे ४ आणि ३ वेळा विजेतेपद मिळवले आहे. दोन्ही संघांच्या चाहत्यांची संख्या देखील अन्य संघांपेक्षा अधिक आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here