नवी दिल्ली: जगातील महान गोलंदाजांमध्ये समावेश होणारा ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू () याचा आज (१३ सप्टेंबर) ५१ वाढदिवस आहे. वॉर्नच्या नावावर तसे अनेक विक्रम आहेत. पण त्याने केलेल्या एका विक्रमची चर्चा मात्र नेहमी केली जाते. तो विक्रम म्हणजे २७ वर्षा पूर्वी फेकलेल्या होय.

वाचा-
शेन वॉर्नने २७ वर्षांपूर्वी म्हणजे ४ जून १९९३ रोजी इंग्लंडचा फलंदाज माइक गॅटिंग टाकलेल्या चेंडूला बॉल ऑफ द सेंच्युरी म्हटले जाते. या चेंडूला गॅटिंग बॉल या नावाने देखील ओळखले जाते. १९९३ साली इंग्लंडविरुद्ध झालेल्या अॅशेस मालिकेतील ओर्ल्ट्रफर्ड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ४ जून रोजी ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नने इंग्लंडचा फलंदाज माइक गॅटिंगला हा चेंडू टाकला होता. या चेंडूला बॉल ऑफ द सेंच्युरी असे म्हटले जाते. शेन वॉर्नच्या चेंडूने क्रिकेट जगताला आश्चर्यचकित केले होते. शेन वॉर्नचा तो चेंडू ९० डिग्रीत वळला होता आणि थेट विकेटवर गेला.

वाचा-
शेन वॉर्न सारखा चेंडूला त्यानंतर पुन्हा टाकण्याचा प्रयत्न अनेकांनी केला पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तसे कोणाला जमले नाही.

वाचा-
शेन वॉर्न क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याने १४५ कसोटीत ७०८ विकेट, तर १९४ वनडेत २९३ विकेट घेतल्या आहेत. शेन वॉर्नने टाकलेल्या या बॉल ऑफ द सेंच्युरी सामन्यात ऑस्ट्रेलियाने १७९ धावांनी विजय मिळवला होता. वॉर्नने ८ विकेट घेत सामनावीर पुरस्कार पटकावला.

वाचा-
श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरण (८०० विकेट)नंतर कसोटीत वॉर्नने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. वॉर्नने कसोटीत ७०८ विकेट घेतल्या आहेत. त्याने १९९२ मध्ये सिडनीत भारताविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००१ विकेट घेतल्या आहेत. वॉर्नने वनडेतील १९४ सामन्यात २९३ विकेट घेतल्या. २००६-०७ साली अॅशेस मालिकेनंतर त्याने निवृत्ती घेतली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here