काहीही झाले तरी भारताचा पराभव करायचा यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ दिवस रात्र एक करत आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन याने सांगितले की प्रशिक्षक अॅण्डू मॅकडॉनल्ड यांनी काल रात्री वानखेडे स्टेडियमच्या बाहेरच कॅम्प लावला. रात्रीच्या वेळी दव कधी पडते याचा अंदाज घेण्यासाठी हा कॅम्प लावल्याचे रिचर्डसन याने सांगितले.
वाचा-
आज आम्ही भिजलेल्या चेंडूने दव पडलेल्या खेळपट्टीवर सराव करणार आहोत. ज्यामुळे सामन्याच्यावेळी दव पडलेल्या खेळपट्टीवर गोलंदाजी करता येऊ शकले. गोलंदाजी कशी होईल यासाठी आम्हाला मॅचच्या दिवसापर्यंत वाट पहावी लागले. दव पडण्याची घटना आमच्यासाठी नवी नाही. ऑस्ट्रेलियात देखील दव पडतात, असे रिचर्डसन म्हणाला.
वाचा-
ऑस्ट्रेलियाचा संघ तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला आहे. मालिकेतील पहिला सामना मुंबईत १४ जानेवारी रोजी होणार आहे. दुसरा सामना राजकोट येथे १७ तारखेला तर तिसरी आणि अखेरची वनडे १९ जानेवारी रोजी बेंगळुरूत होईल. विजेतेपदासाठी यजमान संघच आघाडीवर असतो. भारतात कोणत्याही संघाला सलग मालिका विजय मिळवता आला नाही, याकडे देखील रिचर्डसनने लक्ष वेधले.
वाचा-
गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियाने वनडे मालिकेत ०-२ अशी पिछाडी असताना कमबॅक करत मालिका ३-२ने जिंकली होती. भारतात खेळणे हे नेहमी आव्हानात्मक असते. गेल्या वर्षी जसा निकाल लागला. तसाच निकाल यावेळी देखील लागावा यासाठी आम्ही तयार असल्याचे रिचर्डसन म्हणाला.
वाचा-
Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News