दुबई : आयपीएलचा १३वा हंगाम येत्या शनिवारीपासून सुरू होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. दोन्ही संघ पहिल्या सामन्याची जोरदार तयारी करत आहेत. करोना काळात होत असलेल्या या स्पर्धेसाठीचे नियम वेगळे आहेत. करोनापासून बचावासाठी खेळाडूंना मैदानावर आणि मैदानाबाहेर विशेष निमयांचे पालन करावे लागत आहे.

वाचा-
मुंबई इंडियन्सने आयपीएलचे सर्वाधिक चार वेळा विजेतेपद मिळवले आहे. या वर्षी देखील ते पुन्हा एकदा विजेतेपदाचे दावेदार आहेत. मुंबईचा संघ त्याच्या सरावाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. अशाच एक व्हिडिओ मुंबई संघाने त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. या व्हिडिओत मुंबईचा क्रिकेटपटू गेल्या सहा महिन्यातील कोरना काळातील काय केले आणि आता मैदानावर परतल्यानंतरची परिस्थिती कशी आहे हे सांगतोय.

वाचा-
मुंबई संघाने शेअर केलेला हा व्हिडिओ मराठीत आहे. धवलवर डिसेंबर महिन्यात शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासून त्याला मुंबई संघाने मोठा पाठिंबा दिल्याचे सांगितले. क्रिकेटपटूसाठी सराव करणे, बाहेर पडणे खुप महत्त्वाचे असेत. पण करोनामुळे पुढे गेली आणि त्याचा मला फायदा झाला. कुटुंबासोबत वेळ घालवता आल्याचे धवलने सांगितले. करोना काळात घरच्या जबाबदाऱ्या पत्नी श्रद्धा सोबत शेअर केल्या. बाळासोबत वेळ घालवता आला.

धवलने भारतीय संघाकडून १२ वनडे आणि दोन टी-२० सामने खेळले आहेत. वनडेत त्याने १३ तर टी-२०मध्ये ३ विकेट घेतल्या आहेत. धवलने आयपीएलमधील ९० सामन्यात ८६ विकेट घेतल्या आहेत. १४ धावा देत ४ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. या वर्षी मुंबई संघाने त्याला ७५ लाख या बेस पाइझवर घेतले आहे. याआधी तो राजस्थान रॉयल्स आणि गुजरात लॉयन्स संघाकडून खेळला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here