नवी दिल्ली: २००७ साली पहिल्यांदा खेळवला जात होता. क्रिकेटमधील सर्वात छोटा पॉर्मेटचा वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेत सुरू होता. आजच्या दिवशी १४ सप्टेंबर २००७ रोजी भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी पहिल्या टी-२० वर्ल्ड कपच्या विजेतेपदासाठी लढत होते. डर्बन मधील किंग्समीड मैदानावर झालेला हा सामना टाय झाला आणि त्यामुळे विजेतेपदाचा निर्णय बॉल आउटने घेतला गेला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ३-० असा पराभव केला होता. भारताच्या या विजेतेपदाला आज १३ वर्ष झाली.

वाचा-
टी-२० वर्ल्ड कपमध्ये महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारत प्रथम मैदानात उतरला होता. नाणेफेक झाल्यानंतर पावसामुळे सामना स्थगित करण्यात आला होता. नंतर १४ तारखेला पुन्हा सामना सुरू झाला. या सामन्यात भारताने २० षटकात ९ बाद १४१ धावा केल्या. यात रॉबिन उथप्पाने ५० तर धोनीने ३३ धावांची खेळी केली होती. त्यानंतर पाकिस्तानची सुरुवात खराब झाली पण मिस्बाह उल हकने पाकला शेवटच्या षटकापर्यंत पोहोचवले, पण सामना टाय झाला.

वाचा-
पाकला अखेरच्या षटकात विजयासाठी १२ धावांची गरज होती. भारताकडून श्रीसंतने ही षटक टाकले आणि सामना टाय केला. तेव्हा आयसीसीचा सुपर ओव्हचा नियम नव्हता. त्या ऐवजी बॉल आउटचा नियम होता. भारत-पाक सामन्याआधीपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीच कोणता सामना बॉल आउटवर झाला नव्हता.

वाचा-
या बॉल आउटमध्ये प्रत्येक संघाला पाच वेळा चेंडू विकेटवर मारायचा होता. जो अधिक वेळा मारेल तो विजयी होईल. भारताने या बॉल आउटमध्ये ३ वेळा चेंडू विकेटवर मारला तर पाकिस्तानला एकही चेंडू मारता आला नाही.

वाचा-
भारताकडून हरभजन सिंग, विरेंद्र सेहवाग, रॉबिन उथप्पा यांनी चेंडू टाकले तर पाककडून आफ्रिदी, उमर गुल आणि अराफत यांना चेंडू मारता आला नाही.

वाचा-

धोनीमुळे मिळाला विजय
जेव्हा पाकिस्तानचे गोलंदाज चेंडू टाकत होते तेव्हा त्यांचा विकेटकिपर कामरान अकमल विकेटच्या मागे नॉर्मल विकेटकिपर जसा उभा राहतो तसा उभा राहिला. पाककडून उमर गुल, याशिर अराफात आणि शाहित आफ्रिदी यांनी चेंडू टाकले पण एकाचाही चेंडू विकेटला लागला नाही. भारतीय गोलंदाज जेव्हा चेंडू टाकत होते. तेव्हा धोनी विकेटच्या मागे जाऊन बसला. त्यामुळे गोलंदाजांचे काम सोपे झाले. या विजयाबद्दल बोलताना उथप्पा म्हणाला होता की, आम्हाला फक्त धोनीवर चेंडू टाकायचा होता आणि आम्ही चेंडू बरोबर मारले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीच्या नेतृत्वाखालील भारताचा हा मोठा पहिला विजय होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here