बीसीसीआयने ज्या प्रवीण तांबेवर बंदी घातली होती, त्यालाच आता आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स संघाने आपल्या ताफ्यात सामील करून घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. प्रवीण तांबेवर बीसीसीआयने आयपीएलमध्ये खळण्यास बंदी घातली होती. पण केकेआरच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात कसे काय सामील करून घेतले, याची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. कारण जर प्रवीणवर बंदी असेल तर तो आयपीएलमध्ये कसा काय खेळू शकतो, असा सवाल आता चाहत्यांना पडलेला आहे. पण केकेआरने नेमका काय विचार केला आहे, पाहा…

वाचा-

मुंबईचा फिरकीपटू प्रवीण तांबेवर बीसीसीआयने आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घातलेली आहे. पण प्रवीणने कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये दमदार कामगिरी केली होती. परदेशी लीगमध्ये खेळताना प्रवीणने बीसीसीआयची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे त्याच्यावर बीसीसीआयने बंदी घालण्याची कारवाई केली होती. पण हाच प्रवीण आता तुम्हाला यावर्षीच्या आयपीएलमध्ये केकेआरच्या संघात दिसू शकतो.

प्रवीणवर का घातली होती बंदी…
प्रवीणने क्रिकेटमधून २०१८ साली निवृत्ती घेतली होती. पण या गोष्टीची माहिती त्याने बीसीसीआयला दिली नव्हती. निवृत्ती घेतल्यानंतर प्रवीण एका परदेशी लीगमध्ये खेळला होता. त्याचबरोबर मुंबईमध्ये झालेल्या लीगमध्येही प्रवीण खेळला होता. त्यामुळे बीसीसीआयने प्रवीणवर आयपीएल खेळण्याची बंदी घातलेली होती.

वाचा-

केकेआरने २० लाख रुपयांचा बेस प्राइजवर प्रवीणला संघात स्थान दिले होते. पण बीसीसीआयने त्याच्यावर बंदी घातल्यावर तो आयपीएल खेळू शकणार नाही. पण केकेआरच्या संघाने बराच विचार करून आणि नियमातील तांत्रिक गोष्टी सांभाळून प्रवीणला संघात स्थान दिल्याचे म्हटले जात आहे. केकेआरने नेमका काय विचार केला आहे, पाहा…

केकेआरने नेमकी काय केली आयडिया…केकेआरच्या संघाने प्रवीणला संघात स्थान देण्यासाठी चांगलीच कल्पना लढवली आहे. बीसीसीआयने प्रवीणवर आयपीएलमध्ये खेळण्यासाठी बंदी घातलेली आहे. त्यामुळे त्याला आयपीएलमधील सामने खेळता येणार नाही. पण प्रवीण आयपीएलमधील खेळाडूंना मार्गदर्शन करू शकत नाही, असे मात्र बीसीसीआयने म्हटलेले नाही. त्यामुळे केकेआरने प्रवीणला आपल्या प्रशिक्षकांच्या स्टाफमध्ये सामील करून घेतले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here