नवी दिल्ली: जुलै ते ऑगस्ट या काळात सेलिब्रिटींना मिळणाऱ्या जाहीरातीचा विचार केल्यास बॉलिवडूमधील स्टार लोकांपेक्षा क्रीडा क्षेत्रातील लोकांना अधिक जाहिरात मिळाल्या आहेत. गेल्या दोन महिन्यात चित्रपटातील स्टार्सना कमी जाहीराती मिळाल्या आहेत. तर जाहीराती मिळवण्यात खेळाडूंनी बाजी मारली आहे. अनेक कंपन्यांनी कॉस्ट कटिंगमुळे बंद केल्या आहेत.

वाचा-
जाहिराती कोणाला मिळाल्या याचा विचार करता क्रिकेटपटूंसमोर बॉलिवूड स्टार टिकले नाहीत. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे बॉलिवडूमध्ये सुरू असलेले वाद होय. , सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि विरेंद्र सेहवाग यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा जाहिरात क्षेत्रात प्रवेश केला आहे. क्रिकेटपटूंना जाहिरातीत संधी मिळाली आणि स्टार लोक वादामुळे मागे पडले.

वाचा-
सुशांत सिंह रजपूतच्या आत्महत्येनंतर ज्या गोष्टी घडत आहेत. त्याचा फटका बॉलिवडू सेलिब्रिटिंना बसत आहे.

वाचा-
धोनीने गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. वर्षाच्या आधारावर गेल्या दोन महिन्यात क्रिकेटपटूंच्या जाहिराती १७ टक्क्यांनी वाढल्याचे TAM AdExने म्हटले आहे. TAM AdExच्या अहवालानुसार सर्वाधिक जाहिराती विराट कोहलीला मिळाल्या आहेत. त्यानंतर धोनी, सचिन, गांगुली आणि सेहवाग यांचा क्रमांक लागतो.

वाचा-
बॉलिवूड सेलिब्रिटिंच्या बाबत बोलायचे झाले तर वर्षाच्या आधारावर त्यांच्या जाहिराती ३० टक्क्यांनी घसरल्या आहेत. यामागे सुशांत सिंह रजपूतची आत्महत्या, चीन विरोधातील लोकांचा राग आदी गोष्टी असल्याचे म्हटले जाते. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोहली अव्वल स्थानी होता. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात धोनी दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. अमिताभ बच्चन आणि करीना कपूर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.

वाचा-
सेलिब्रिटिंसोबतच्या करारात मार्च महिन्यापासून घसरण होत आहे. करोना काळात सर्वांनी जाहिराती कमी केल्या आहेत. येणाऱ्या काळात बॉलिवडू सेलिब्रिटींच्या जाहिराती आणखी कमी होऊ शकतात असे म्हटले जात आहे.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here