मॅनचेस्टर: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी मॅनचेस्टर येथे दुसरा वनडे सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला आणि इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वॉक्सची घातक गोलंदाजीने मजबूत स्थितीत असलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव कोसळला. या सामन्यातील एका विकेटने सामन्याचा निकाल बदलला.

वाचा- वाचा-
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियापुढे फक्त २३२ धावांचे लक्ष्य दिले होते. ऑस्ट्रेलियाने ३२ षटकात ४ बाद १४५ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच स्थिर झाला होता. इंग्लंडकडून ३३वे षटक वॉक्सने टाकले. त्याच्या षटकातील पहिले दोन चेंडू फिंचने सावधपणे खेळले. पण त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर बचाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या फिंचची चूक झाली आणि तो बोल्ड झाला. ही विकेट सामन्याच टर्निंग पॉइंट ठरली. फिंचने ७३ धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव २०७ धावात संपुष्टात आला.

वाचा- वाचा-
वॉक्सने या सामन्यात १० षटकात ३२ धावा देत ३ विकेट घेतल्या. त्याने तिनही विकेट एकाच स्पेलमध्ये घेतल्या. दोन बाद १४४ असलेल्या ऑस्ट्रेलियाची अवस्था ६ बाद १४७ अशी झाली. या झटक्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ सावरू शकला नाही.

वाचा- वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here