कराची: करोना व्हायरसचे संकट असताना देखील अनेक देशांनी विविध क्रीडा स्पर्धांना परवानगी दिली आहे. या स्पर्धेच्या आयोजनाची, तसेच खेळाडूंच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित क्रीडा संघटनेला घ्यावी लागते. असे असताना देखील अर्थात पीसीबीने एक हैराण करणारा निर्णय घेतला आहे.

वाचा-
पाकिस्तानमध्ये या महिन्याच्या अखेरीस नॅशनल टी-२० चॅम्पियनशिप सुरु होणार आहे. या स्पर्धेत खेळणारे सर्वा खेळाडू, अधिकारी आणि अन्य लोकांना करावी लागणार आहे. या सर्वांना म्हणजे २४० जणांना पीसीबीने करोना चाचणीचे पैसे देण्यास सांगितले आहे.

वाचा-
बोर्डाने रावळपिंडी आणि मुल्तान येथे ३० सप्टेंबर रोजी सुरू होणाऱ्या स्पर्धेच्या आधी सर्वांची दोन करोना चाचणी नेगेटिव्ह येणे बंधनकारक केली आहे. यातील पहिल्या चाचणीचे पैसे पीआयबी देणार आहे. तर दुसऱ्या चाचणीचे पैसे खेळाडू आणि अधिकाऱ्यांना द्यावे लागणार आहेत.

वाचा-
नॅशनल टी-२० चॅम्पयिनशिप स्पर्धेनंतर सुपर लिग स्पर्धा अर्थात पीएसएल मधील उर्वरीत सामने होणार आहेत. या स्पर्धेत काही विदेशी खेळाडू देखील आहेत. तेव्हा देखील पाकिस्तान बोर्ड खेळाडूंकडून करोना चाचणीचे पैसे घेणार का असा सवाल आता विचारला जात आहे. पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. तेव्हा ४२ जण होते. या सर्वांच्या करोना चाचणीचे पैसे बोर्डाने दिले होते.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here