नवी दिल्ली: IPLची सुरूवात शनिवारी युएईमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्या सामन्यापासून होणार आहे. गेल्या वर्षीचे विजेते मुंबई आणि उपविजेते चेन्नई यांच्यातील या सामन्याने आयपीएलची धमाकेदार सुरुवात होईल. या वर्षी वीव्होने आयपीएलचे प्रायोजकत्व काढून घेतल्याने हे नवे प्रायोजक आहेत.

वाचा-
ड्रीम ११ने या टी-२० लीगशी संबंधित भारतीय खेळाडूंची एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीमध्ये महेंद्र सिंह धोनी, रोहित शर्मा, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत सारखे खेळाडू मैदानावर नव्हे तर गल्लीत क्रिकेट खेळताना दिसत आहेत. शिखर धवनने या जाहिरातीचा व्हिडिओ इस्टाग्रामवर शेअर केला आहे.

वाचा-

वाचा-
या जाहिरातीमधून गल्ली क्रिकेटच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. जेथे विकेट म्हणून खुर्ची असते. आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. चेंडू गटारीत जातो असे अनेक प्रकार घडतात. ड्रीम ११च्या या जाहिरातीमध्ये गल्ली क्रिकेटमधील सर्व प्रकारचा रोमांच दाखवला आहे. ड्रीम ११ आयपीएलच्या या धीम सॉन्गला यह अपना गेम हे असे म्हटले आहे.

वाचा-
वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here