वाचा-
करोनामुळे ही स्पर्धा भारतामध्ये होत नसून ती युएईमध्ये होत आहे. त्यामुळे युएईच्या नियमानुसार भारताला आयपीएल खेळवावी लागणार आहे. आयपीएलचे आयोजन कसे केले जात आहे, याची पाहणी करण्यासाठी गांगुली हे युएईमध्ये दाखल झाले आहेत. पण युएईमध्ये दाखल झाल्यावर त्यांच्याकडे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी एक नियम बदलण्याची मागणी केलेली आहे.
वाचा-
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्याच्या घडीला क्रिकेट मालिका सुरु आहे. ही मालिका संपल्यावर या दोन्ही देशांचे खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी युएईमध्ये येणार आहे. पण युएईमध्ये आल्यावर त्यांना सरकारच्या नियमानुसार सात दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. पण जर हे खेळाडू सात दिवस क्वारंटाइन राहिले तर त्यांना आयपीएलमधील सर्व सामने खेळता येणार नाहीत. त्यामुळे या दोन्ही देशांच्या खेळाडूंनी आम्हाला तीन दिवस क्वारंटाइन राहिल्यावर संघाबरोबर खेळण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी या दोन्ही देशांच्या खेळाडूंनी केलेली आहे.
वाचा-
परदेशातून आल्यावर सात दिवस क्वारंटाइन राहावे लागते, असा युएईचा नियम आहे. पण हे खेळाडू आपली करोना चाचणी करून येणार आहेत, त्याचबरोबर युएईमधील सर्व चाचण्यांसाठी ते तयार आहे. पण सात दिवसांऐवजी तीन दिवस आपल्याला क्वारंटाइन करावे, अशी मागणी त्यांनी केलेली आहे. ही मागणी गांगुली यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे गांगुली आता याबाबत काय निर्णय घेतात, याकडे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांच्या खेळाडूंचे लक्ष आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times