वाचा- लागणारवाचा-
यांनी मध्यमगती गोलंदाज म्हणून छाप पाडली. क्रिकेटची पंढरी असलेल्या इंग्लंडमधील लँकेशायर, नॉर्थस्टॅपोर्डशायर आणि नॅन्टविच या क्रिकेट क्लबकडून खेळताना फलंदाजी आणि गोलंदाजीत ठसा उमटवला. महाराष्ट्र रणजी संघात प्रतिनिधीत्व करताना त्यांनी भारतीय संघ निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. दोन डिसेंबर १९५५ मध्ये मुंबईत भारत आणि न्यूझीलंड या सामन्यांसाठी भारतीय संघात त्यांची निवड झाली. कर्णधार पॉली उम्रिगर यांच्या नेतृत्वाखाली खेळताना न्यूझीलंडचा धोकादायक खेळाडू जॉन रिड याला दोन्ही डावात बाद केले.
वाचा-
वाचा-
भारतीय संघात निवड होण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राकडून १९५२ ते १९६४ या कालावधीत खेळताना ३६ सामन्यात तीन अर्धशतकासह ८६६ धावा केल्या. तसेच ३०.६६ सरासरीने ८३ बळी मिळवले. ३८ धावात पाच बळी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली. भारतीय संघाचे दरवाजे बंद झाल्यावरही त्यांनी महाराष्ट्र संघाकडून खेळणे सुरू ठेवले होते. १९६२ मध्ये ते महाराष्ट्र संघाचे कर्णधार होते.
वाचा-
२०१७ मध्ये जिल्हा क्रिकेट संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले होते. व्यवसायिक खेळाडू म्हणून त्यांची कारकीर्द प्रभावी ठरली. ते जे.आर.डी. टाटा यांच्या स्वदेशी मिल मध्ये ३६ वर्षे कार्यरत होते
वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times