वाचा-
वॉर्नने राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद सांभाळले होते. संघात जास्त नावाजलेले खेळाडू नसताना वॉर्नने युवा खेळाडूंची एक मोट बांधली होती. त्याचबरोबर कल्पक नेतृत्वाच्या जोरावर वॉर्नने राजस्थानला जेतेपद पटकावून दिले होते. पण त्यानंतर वॉर्नने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
वाचा-
क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर वॉर्नने संघाच्या मार्गदर्शकाची भूमिकाही वठवली होती. पण त्यानंतर वॉर्न राजस्थानच्या संघातून बाहेर पडला होता. त्यानंतर वॉर्न हा राजस्थानच्या संघाचा ब्रँड अॅम्बेसेडर होता. त्यानंतर वॉर्नचा संघाशी थेट संबंध आला नव्हता. पण वॉर्न गेल्यानंतर राजस्थानला एकदाही जेतेपद मात्र पटकावता आले नव्हते. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजस्थानच्या संघासाठी वॉर्न धावून आल्याचे पाहायला मिळत आहे.
वाचा-
राजस्थानच्या संघात काय करणार वॉर्नवॉर्न राजस्थानच्या संघात आला असला तरी तो काय करणार, याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. वॉर्नने आता क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे वॉर्न आता राजस्थानच्या संघातून खेळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. राजस्थानच्या संघाने वॉर्नला आता मार्गदर्शक (मेंटॉर) या पदासाठी आपल्या संघात घेतलेले आहे. राजस्थानच्या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद अँण्ड्र्यू मॅकडोनॉल्ड यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे वॉर्न हा मॅकडोनॉल्ड यांच्याबरोबर एकत्रितपणे काम करणार आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times