गेल ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये एक हजार षटकार पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे. गेलने एखादा जोरदार फटका खेचला की तो थेट सीमारेषेपार जातो, असे आपण बऱ्याचदा पाहिले आहे. या चिमुकल्याची फलंदाजी पाहतानाही गेलची आठवण आल्यावाचून चाहत्यांना राहत नाही. कारण या चिमुकल्यानेही मारलेले फटके लांबपर्यंत जात आहेत.
भारताचा क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा फलंदाजी करत आहे. या लहान मुलाचे वय जवळपास तीन वर्षे असल्याचे म्हटले जात आहे. तो डावखुरा फलंदाज आहे. हा लहान मुलगा चेंडूची लाईन आणि लेंथ बघतो आणि मोठ मोठे फटके लगावत असल्याचे पाहायला मिळत आहे. ही गोष्ट फक्त एकदा किंवा दोनदा झालेली नाही.
वाचा-
या व्हिडीओमध्ये या मुलाला चार चेंडू टाकण्यात आले. चारही चेंडू वेगवेगळ्या लाईनवर टाकले होते. पण चारही वेळा या लहान मुलाने मोठे फटके मारल्याचे पाहायला मिळाले आहे. या फटक्यांमध्ये टायमिंग एवढे योग्य असल्याचे पाहायला मिळाले आहे की, चेंडू थेट लांब जात असल्याचेच दिसत आहे.
वाचा-
या व्हिडीओमध्ये आकाशने समालोचनही केले आहे. हा लहान मुलगा कसे फटके मारतो, हे आकाशने या व्हिडीओमध्ये सांगतिले आहे. त्याचबरोबर या व्हिडीओखाली आकाशने लिहिले आहे की, ” हा लहान मुलगा किती जोरदार फटके लगावत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना हॅल्मेट देण्याची वेळ आलेली आहे.” हा लहान मुलगा नेमका कोण आहे आणि त्याचे नाव काय, ही माहिती अजूनही पुढे आलेली नाही. आकाशनेही या लहान मुलाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times