भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन हा मुंबई इंडियन्सच्या संघातील खेळाडूंबरोबर दिसला होता. त्यामुळे आता अर्जुन मुंबई इंडियन्सच्या संघातून खेळणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे. जाणन घ्या याबाबतचे सत्य…

वाचा-

मुंबईचे खेळाडू नेटमध्ये जोरदार तयारी करत आहेत. नेटमध्ये मुंबईच्या फलंदाजांना बॅटिंगचा सराव देणाऱ्या गोलंदाजांमध्ये अर्जुन तेंडुलकरचा देखील समावेश आहे. सोमवारी फिरकीपटू राहुल चाहरने अर्जुन आणि अन्य खेळाडूंसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत सर्व जण स्विमिंग पूलमध्ये दिसत आहेत.

यापूर्वी अर्जुनला दुबईमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाबरोबर पाहिले गेले आहे. अर्जुन हा मुंबईच्या खेळाडूंबरोबर सराव करतानाही दिसत आहे. पण अर्जुनला मुंबई इंडियन्सने आपल्या संघात स्थान दिलेले नाही. पण मग अर्जुन मुंबईच्या संघाबरोबर काय करतोय, हा प्रश्नही उपस्थित होतो.

अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या संघाबरोबर काय करतोअर्जुन मुंबईच्या संघाबरोबर असला तरी तो आयपीएल खेळणार नाही. कारण अर्जुन हा मुंबईच्या संघांतील खेळाडूंना सराव देण्यासाठी नेट्समध्ये पाहायला मिळत आहे. प्रत्येक संघाला नेट्समध्ये सराव करण्यासाठी काही युवा खेळाडूंची गरज असते. अर्जुन हा एक युवा वेगवान गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीवर संघातील खेळाडूंना सराव मिळावा, एवढाच उद्देश मुंबई इंडियन्सच्या संघाचा आहे. त्यामुळे अर्जुन मुंबई इंडियन्सच्या संघातून खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाचा-

आयपीएलचा () १३वा हंगाम १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरु होत आहे. करोना व्हायरसमुळे ही स्पर्धा या वर्षी भारता बाहेर होत आहे. मुंबई इंडियन्सने ( ) या स्पर्धेचे सर्वाधिक चार विजेतेपद मिळवली आहेत. या वर्षी मुंबई विक्रमी ५वे विजेतेपद मिळवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी मुंबईचा संघ कसून सराव करत आहे. संघातील खेळाडू प्रत्येकवेळी फलंदाजाला गोलंदाजी करतील, असे सांगता येत नाही. कारण ते त्यांचा वैयक्तिक सरावही करत असतात. त्यामुळे फलंदाजांना सराव करण्यासाठी अतिरीक्त गोलंदाज हवे असातात. त्यामुळे युवा खेळाडूंना नेट्समध्ये गोलंदाजी करण्याची परवानगी दिली जाते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here