मॅनचेस्टर: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने ७ बाद ३०२ धावा केल्या. जॉन बेयरस्टो १२६ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांसह ११२ धावा केल्या. सॅम बिलिंग्सने ५७ तर ख्रिस वोक्सने ५३ धावा केल्या.

वाचा-
३०३ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानावर उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. ज्याचा फायदा इंग्लंडने घेतला. पारडे इंग्लंडच्या बाजूने असताना जोफ्रा आर्चरने एक मोठी चूक केली. ज्याची किमत इंग्लंडला सामना आणि मालिका गमवून चूकवावी लागली.

वाचा-
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे मुख्य फलंदाज फक्त ७३ धावांवर बाद झाले होते. इंग्लंडचा संघ विजयाच्या दिशेने जात असातना आर्चरकडून चूक झाली. एलेक्स कॅरी १७ चेंडूत ९ धावा करून खेळत होता. तेव्हा आर्चरने त्याला बाद केले. पण तिसऱ्या अंपायरने आर्चरचा पया क्रीज बाहेर असल्याचे सांगितले आणि नो बॉल दिला. या जीवनदानाचा कॅरीने भरपूर फायदा घेतला आणि १४४ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह १०६ धावा केल्या. कॅरीने दमदार खेळीसह पराभव होत असेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

वाचा-

या सामन्यात इंग्लंडच्या बेयरस्टॉने शतकी खेळी केली. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात १० शतक करणारा तो चौथ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. या बाबत त्याने भारताच्या शिखर धवनला मागे टाकले. शिखरने ७७ डावात १० शतक केली होती. तर बेयरस्टॉने ७६ डावात ही खेळी केली. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक पहिल्या स्थानावर आहे त्याने ५५ डावात १० शतक केली आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here