मालिकेत १-१ अशी बरोबर झाल्याने अखेरचा सामना निर्णायक होता. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात ७ बाद ३०२ धावा केल्या. इंग्लंडची सुरूवात खराब झाली. मिशेल स्टार्कने सामन्यातील पहिल्या दोन चेंडूत दोन विकेट घेतल्या. पण त्यानंतर जॉनी बेयरस्टोने १२६ चेंडूत १२ चौकरा आणि दोन षटकारांसह ११२ धावा केल्या. सॅम बिलिंग्स यांनी ५८ चेंडूत ५६ धावा केल्या. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ११४ धावा केल्या. ही भागिदारी तेव्हा झाली जेव्हा इंग्लंडची अवस्था चार बाद ९० अशी होती. त्यानंतर ख्रिस वोक्सने ३९ चेंडूत नाबाद ५३ धावा ठोकल्या.
वाचा-
मिशेल स्टार्कचा दणका
इंग्लंडच्या डावात स्टार्कने पहिल्या दोन चेंडूवर दोन विकेट घेतल्या. त्याने पहिल्या चेंडूवर जेसन रॉयला तर दुसऱ्या चेंडूवर जो रुटला LBW बाद केले. यामुळे इंग्लंडची अवस्था शून्यवर दोन बाद अशी होती. वनडे क्रिकेटमध्ये २००५ नंतर दुसऱ्यांदा असे झाले आहे की पहिल्या ओव्हरच्या दोन चेंडूवर दोन विकेट पडल्या. २०१३ साली दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात प्रथम असे झाले होते.
बेयरस्टोचा विक्रम
इंग्लंडकडून शतक करणाऱ्या बेयरस्टोने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात १० शतक करणारा तो चौथ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. या बाबत त्याने भारताच्या शिखर धवनला मागे टाकले. शिखरने ७७ डावात १० शतक केली होती. तर बेयरस्टॉने ७६ डावात ही खेळी केली. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक पहिल्या स्थानावर आहे त्याने ५५ डावात १० शतक केली आहेत.
वाचा-
इंग्लंडने निम्मा विजय मिळवला, पण…
प्रथम फलंदाजी करत ३०३ धावा केल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी कमाल केली. त्यांनी ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद ७३ अशी केली. ३०३ धावांचे लक्ष्याचा पाठलाग करताा ऑस्ट्रेलियाने सामना जवळपास हरला होता. पण तेव्हा अॅलेक्स केरी आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी सामना फिरवला. या दोघांनी शतकी खेळी केली. कॅरीने १०६ तर मॅक्सवेलने १०८ धावा केल्या.
वाचा-
जोफ्रा आर्चरची एक चूक इंग्लंडला महागात पडली
इंग्लंडचा संघ विजयाच्या दिशेने जात असातना आर्चरकडून चूक झाली. एलेक्स कॅरी १७ चेंडूत ९ धावा करून खेळत होता. तेव्हा आर्चरने त्याला बाद केले. पण तिसऱ्या अंपायरने आर्चरचा पया क्रीज बाहेर असल्याचे सांगितले आणि नो बॉल दिला. या जीवनदानाचा कॅरीने भरपूर फायदा घेतला आणि १४४ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह १०६ धावा केल्या. कॅरीने दमदार खेळीसह पराभव होत असेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. कॅरी आणि मॅक्सवेल यांनी सहाव्या विकेटसाठी २१२ धावांची विजयी भागिदारी केली.
कॅरीने या सामन्यात आंतरराष्ट्रीय वनडेमधील पहिले शतक झळखावले. याआधी वनडेमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ३७ होती. ऑस्ट्रेलियाकडून एका दशकात शतक करणारा तो दुसरा विकेटकीपर ठरला आहे.
वाचा-
मॅक्सवेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
या सामन्यात मॅक्सवेलने वनडे क्रिकेटमधील ३ हजार धावाचा टप्पा पार केला. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने इतकी धावसंख्या करण्याचा विक्रम मॅक्सवेलने स्वत:च्या नावावर केला. त्याने फक्त २ हजार ४४० चेंडूत ३ हजार धावा केल्या. हा विक्रम जेस बटरलच्या नावावर होता. त्याने २ हजार ५३२ चेंडूत ३ हजार धावा केल्या होत्या.
पाच वर्षात प्रथम वनडे मालिका गमावली…
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात ३ विकेटनी विजय मिळवला आणि मालिका २-१ने जिंकली. यासह इंग्लंड संघाने तिसऱ्या वनडेसह मालिका देखील गमावली. त्यांनी पाच वर्षानंतर घरच्या मैदानावर वनडे मालिका गमावली. याआधी इंग्लंडने घरच्या मैदानावर आयर्लंड, पाकिस्तान, भारत, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांचा पराभव केला होता.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times