वाचा-
देशमुख यांना काही दिवसांपूर्वी ताप आला होता. पण त्यांनी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यास नकार दिला होता. त्यानंतर ९ दिवसांनी देशमुख यांना करोना झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांची करोना चाचणी ही पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर त्यांना ठाणे येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. वेदांत हॉस्पिटलमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वाचा-
देशमुख यांनी अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत पुण्याच्या संघाकडून खेळताना सलग सात शतके झळकावली होती. मुंबईमध्ये महिंद्रा क्लब आणि दादर पारसी झोरास्ट्रीयन क्लबमधून ते स्थानिक क्रिकेट खेळत होते. एक धडाकेबाज क्रिकेटपटू म्हणून त्यांचा लौकिक होता. पण त्यांना झालेल्या दुखापतींमुळे ते जास्त काळ क्रिकेट खेळू शकले नाहीत. पण युवा क्रिकेटपटूंसाठी मात्र ते गॉडफादर होते. कारण होतकरू क्रिकेटपटूंना ते नेहमीच मदत करत असायचे. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी चांगले क्रिकेटपटू घडावेत, असा त्यांचा मानस होता. त्यामुळे युवा क्रिकेटपटूंना सर्वतोपरी मदत ते करत असायचे.
वाचा-
“माझ्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालली कुच बिहार करंडकामध्ये खेळताना देशमुख यांनी दमदार कामगिरी केली होती. या स्पर्धेत देशमुख यांनी फक्त पाच डावांमध्ये तीन शतकेही झळकावली होती. देशमुख हे एक धडाकेबाज फलंदाज होते. त्यांच्या फलंदाजीत चांगलीच आक्रमकता भरलेली होती. आम्ही दोघे एकत्र खेळतच मोठे झालो,” असे महाराष्ट्राचे माजी रणजी क्रिकेटपटू अभिजित देशपांडे यांनी यावेळी सांगितले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times