दुबई: () विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू (Royal Challengers Bangalore) संघ आपल्या पहिल्या विजेतेपदासाठी जोरदार तयारी करत आहे. आयपीएलच्या १२ हंगामात विराटची कामगरी शानदार आहे. पण त्याला कधी विजेतेपद मिळवता आले नाही. या वर्षी विराट आणि कंपनी जेतेपदासाठी मैदानात अधिक ताकदीने उतरणार आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धाव करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याचा सोबत आफ्रिकेचा एबी डिव्हीलियर्स देखील आहे. या दोघांनी अनेक सामन्यात शानदार विजय मिळवून दिला आहे. पण RCBला कधी विजेतेपद मिळवता आला नाही. या वर्षी आयपीएल सुरू होण्याआधी विराट आणि कंपनी जोरदार तयारी करत आहे.

वाचा-

बेंगळूरूला पहिले विजेतेपद मिळून देण्याच्या तयारीत असलेल्या विराटला IPL 2020 सुरू होण्याआधी मोठा धक्का बसला आहे. RCBच्या खेळाडूंमध्ये झालेल्या सराव सामन्यात विराट कोहलीच्या संघाचा पराभव झाला. १९ तारखेपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत बेंगळूरू संघाचा पहिला सामना २१ सप्टेंबर रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. त्याआधी आरसीबीच्या खेळाडूंचा सराव सामना झाला. या सामन्यात विराट विरुद्ध चहल असे दोन गटात सामने झाले. यात विराटच्या संघाचा पराभव झाला.

वाचा-

संघाचे डायरेक्टर माइक हेसन यांनी दोन गट केले. चहलच्या संघात डिव्हिलियर्स, देवदत्त पडिक्कल, उमेश यादव, नवदीप सैनी आदी खेळाडू होते. तर कोहलीच्या संघात पार्थिव पटेल, ख्रिस मार्टिन, इसुरू उडाना, मोहम्मद सिराज हे खेळाडू हेते.

या सामन्यात विराटच्या संघाला विजय मिळवता आला नाही. चहलच्या संघाकडून एबीने ३३ चेंडूत ४४ धावा केल्या. तर वॉशिंगटन सुंदरने ११ धावात २ विकेट घेतल्या. विजयाचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या विराट संघाला यश आले नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here