मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने आयपीएलमधून माघार घेतली आहे. मुंबई इंडियन्सच्या संघासाठी हा एक मोठा धक्का आहे. कारण आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये सर्वात जास्त विकेट्स मलिंगाच्या नावावर आहेत. पण मुंबई इंडियन्सने मलिंगासाठी पर्यायी गोलंदाज शोधलेला आहे, असे कर्णधार रोहित शर्माने सांगितले आहे. मलिंगासाठी पर्यायी गोलंदाज नेमका कोण असेल, पाहा…

मुंबई इंडियन्सचा संघ यावेळी पाचव्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झालेला आहे. पण मलिंगा खेळणार नसल्यामुळे संघापुढे मोठी अडचण आहे. कारण मलिंगासारख्या अनुभवी गोलंदाजाची जागा कोणीही घेऊ शकणार नाही. पण त्याच्या जागी मुंबईला एक वेगवान गोलंदाज खेळवावा लागणार आहे. मलिंगाने आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये १२० सामन्यांमध्ये १७० विकेट्स घेतलेल्या होत्या.

याबाबत रोहित शर्मा म्हणाला की, ” मलिंगा या मोसमात आमच्याबरोबर नसेल. मलिंगाची जागा कोणीही घेऊ शकणार नाही. कारण मलिंगाकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. बऱ्याचदा मलिंगा आमच्यासाठी मॅत विनरही ठरलेला आहे. त्यामुळे त्याची जागा भरणे आमच्यासाठी नक्कीच अवघड असेल. पण मलिंगासाठी पर्यायी गोलंदाज आम्ही खेळवणार आहोत.”

रोहित पुढे म्हणाला की, ” मलिंगाची जागा घेण्यासाठी काही पर्याय आमच्यासमोर खुले आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघात जेम्स पॅटीन्सन, धवन कुलकर्णी आणि नॅथल कल्टर नाइल असे तीन वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे या तिघांपैकी एका गोलंदाजाला आम्ही मलिंगाच्या जागी खेळवू शकतो.”

मुंबई इंडियन्स सध्याच्या घडीला काही गोष्टी हातच्या राखून ठेवत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण रोहितने मलिंगाची जागा कोण घेणार हे सांगताना मुंबई इंडियन्सच्या संघातील एका वेगवान गोलंदाजाचे नाव घेतलेले नाही आणि त्यालाच मलिंगाची जागा मिळू शकते, असे काही क्रिकेट जाणकार बोलत आहेत. मुंबईच्या संघातील मलिंगाची जागा हा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट घेऊ शकतो. कारण बोल्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराबरोबर बोल्ट हा वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसू शकतो.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here