धोनीचे भारताबाबतचे प्रेम सर्वश्रूत आहे. कारण धोनी बऱ्याचदा भारताच्या आर्मीबरोबर सराव करत असल्याचेही पाहायला मिळाले आहे. गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषकानंतर धोनी भारतीय आर्मीबरोबर काही दिवस जम्मू आणि काश्मीरमध्ये सराव करण्यासाठी गेला होता. त्याचबरोबर धोनीना मानदपदही भारतीय दलाकडून देण्यात आलेले आहे. त्यामुळे सध्याच्या वातावरणात धोनी हा चीनच्या कंपनीबरोबर कसा काय करार करू शकतो, असा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे. पण धोनीने मात्र याबाबत आपले मत व्यक्त केलेले नाही.
ओपो या कंपनीने काही व्हिडीओ ओपो इंडिया या खात्यावरून ट्विट केले आहेत. या व्हिडीओमध्ये धोनी पाहायला मिळत आहे. करार झाल्याशिवाय कोणताही क्रिकेटपटू कंपनीच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत नाही. त्यामुळे धोनी आणि या कंपनीचा करार झाला असेल. या कंपनीने आयपीएलचे औचित्य साधत धोनीचे काही व्हिडीओ आपल्या ट्विटरवरून पोस्ट केल्याचे पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी चीनच्या एका कंपनीबरोबर भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने करार केल्याचेही पाहायला मिळाले होते. पेटीएम या कंपनीमध्ये चीनच्या एका कंपनीची भागीदारी आहे. पेटीएम या कंपनीने आता पेटीएम फर्स्ट गेम्स, असे एक अॅप आणलेले आहे. यासाठी सचिनची सदिच्छादूत म्हणून निवड केल्याचे आता समोर आले आहे. त्यानंतर अखिल भारतीय व्यापारी संघटनेने सचिनला एक पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये तू चीनबरोबरच्या कंपनीशी करार यापुढे कायम ठेवून नये, तो मोडावा, अशी विनंती व्यापारी संघटनेने सचिनला केलेली होती.
धोनी गेल्या वर्षी विश्वचषकात आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर धोनी हा भारतीय आर्मीबरोबर जम्मू आणि काश्मीरमध्ये सरावाला गेला होता. त्याचबरोबर भारतीय वायूदलाने धोनीला लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवीही दिली आहे. धोनी हा वायू दलातील पॅरा रेजिमेंट दलाच्या सरावात सहभागी होत असतो. अशाच एका सरावात धोनी सहभागी झाला होता.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times