वाचा-
आयपीएलमधील सर्वात मोठा फॅन फॉलोअर्स असलेला संघ म्हणून देखील मुंबईची ओळख आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजचे फॉलोअर्स ५ मिलियनच्या (MI 5 million Followers) पुढे गेले . आयपीएलचे मुंबईनंतर सर्वाधिक विजेतेपद मिळवणारा चेन्नई सुपर किंग्जचा क्रमांक दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे फॉलोअर्स ४.८ मिलियन इतके आहेत. तर विराट कोहली नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघ ४ मिलियनसह तिसऱ्या स्थानावर आहे.
वाचा-
गेल्या वर्षी झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघाचा फक्त एका धावाने पराभव केला होता. तर २०१७ साली देखील त्यांनी पुणे सुपरजायंट्स संघाचा एका धावाने पराभव केला होता. गेल्या काही वर्षात मुंबईच्या चाहत्यांची संख्या मोठी वाढली आहे.
वाचा-
या वर्षी करोना व्हायरसमुळे स्पर्धा युएईमध्ये होते आहे. त्यामुळे चाहत्यांना मैदानात जाऊन संघाला सपोर्ट करता येणार नाही. क्रिकेटपटूंना जसे चाहत्यांशिवाय गमत नाही तसेच चाहत्यांना देखील क्रिकेटच्या मैदानावर गेल्याशिवाय करमत नाही. पण यावेळी प्रेक्षकांशिवाय खेळावे लागणारे आहे.
वाचा-
पण तुम्हाला मैदानात जाता येत नसेल तरी मुंबई संघाचे सर्व अपडेट मिळवून देण्याची सोय करण्यात आली आहे. अगदी सराव, खेळाडूंचे फोटे, व्हिडिओ आदी सर्व गोष्टी आणि स्पर्धा सुरू झाल्यानंतर देखील सर्व अपडेट अगदी तुमच्या हातात येणार आहेत.
वाचा-
मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना हे सर्व मिळणार आहे ते त्यांच्या मोबाइलवर, यासाठी मुंबई संघाने एक दिला आहे. तुम्हाला फक्त इतक करायचे आहे की हा नंबर सेव्ह करून त्यावर whatsappवरून फक्त hi पाठवायचा.
मुंबई इंडियन्सचे सामने
19 सप्टेंबर , शनिवार – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
23 सप्टेंबर, बुधवार – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
28 सप्टेंबर, सोमवार – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
1 ऑक्टोबर, गुरुवार – किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
4 ऑक्टोबर, रविवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दुपारी 3.30 वाजल्यापासून, शारजा
6 ऑक्टोबर, मंगळवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
11 ऑक्टोबर, रविवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
16 ऑक्टोबर, शुक्रवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
18 ऑक्टोबर, रविवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
23 ऑक्टोबर, शुक्रवार – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजा
25 ऑक्टोबर, रविवार – राजस्थान ऱॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
28 ऑक्टोबर, बुधवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
31 ऑक्टोबर, शनिवार – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई
3 नोव्हेंबर, मंगळवार – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजा
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times