इंग्लंडने दिलेल्या मोठ्या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद ७३ अशी झाली होती. पण त्यानंतर अॅलेक्स केरी आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी सामना फिरवला. या दोघांनी शतकी खेळी केली. कॅरीने १०६ तर मॅक्सवेलने १०८ धावा केल्या.
वाचा-
या सामन्यात इंग्लंडची फलंदाजी सुरू असताना मिशेल स्टार्कला फलंदाजाला बाद करण्याची संधी होती. पण त्याने बाद केले नाही. जाणून घ्या काय झाले…
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजी करत असताना त्याला मंकडिंगची संधी होती. स्टार्क चेंडू टाकायला आल्यानंतर आदिल राशिद चेंडू टाकण्याआधी क्रीज बाहेर गेला. तेव्हा स्टार्कने त्याला बाद न करता क्रीजच्या आत जाण्यास सांगितले.
वाचा-
या घटनेवर सोशल मीडियावर सर्व जण भारताचा फिरकीपटू आर अश्विनला टार्गेट करण्यास सुरुवात केली. एका चाहत्याने अश्विनला टॅग करून, कृपया काही तरी शिका. कशा पद्धतीने खेळले जाते.
यावर अश्विनने संबंधित चाहत्याला उत्तर दिले. मी चांगली लढत लढण्यात विश्वास ठेवतो. वाट पाहा मी पुन्हा परत येणार. अर्थात सोशल मीडियावर अशा पद्धतीने अश्विनला मंकडिंगवरून अश्विनला टार्गेट करण्याची पहिली वेळ नाही.
वाचा-
अश्विनने आयपीएलच्या १२व्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला ‘मंकड स्टाइल’ धावबाद केले होते. तेव्हा या प्रकरणावरून मोठा वाद देखील झाला होता. आयपीएलच्या आधी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अशाच पद्धतीने लाहीरू तिरीमन्नेला बाद केले होते. मात्र, तत्कालीन कर्णधार वीरेंद्र सेहवागने अपील मागे घेतले होते.
‘मंकड स्टाइल’ काय?
अशा पद्धतीने धावबाद करण्याला मंकड स्टाइल धावबाद असे म्हटले जाते. भारताचे माजी कर्णधार विनू मंकड यांच्या नावावरून धावबाद करण्याच्या या अनोख्या शैलीला मंकड स्टाइल म्हटले जाते. भारतीय संघ १९४७मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. त्या वेळी मंकड हे गोलंदाजी करीत असताना ऑस्ट्रेलियाचे फलंदाज बिल ब्राउन यांनी क्रिज सोडली. मंकड यांनी ब्राउन यांना धावबाद केले. त्या वेळी मंकड यांच्यावरही टीका झाली होती. मात्र, डॉन ब्रॅडमन यांनी मंकड यांना पाठिंबा दिला होता. कारण, क्रिकेटच्या नियमात हे स्पष्ट पणे म्हटले आहे, की गोलंदाजाने चेंडू फेकण्याआधीच नॉन-स्ट्राइकच्या फलंदाजाने क्रिज सोडता कामा नये. आयसीसीचा नियम ४१.१६मध्ये याचा उल्लेख आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times