चेन्नई सुपर किंग्स संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आता आयपीएलमध्ये एक इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. कारण जडेजाला एक आयपीएलमधील विक्रम खुणावत आहे. या हंगामात जडेजा हा विक्रम सहज रचू शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळे या मोसमात जडेजाच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असेल.

वाचा-

आतापर्यंत जडेजा आयपीएलमध्ये १७० सामने खेळला आहे. चेन्नईच्या संघाने २०१२ साली विक्रमी ९.७२ कोटी रुपये मोजत जडेजाला आपल्या संघात स्थान दिले होते. जडेजाना आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर चेन्नईच्या विजयात बऱ्याचदा हातभार लावला आहे. पण आता जडेजा एक इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे.

आयपीएलमध्ये २००० धावा पूर्ण करण्यासाठी जडेजाला फक्त ७३ धावांची गरज आहे. जडेजा या हंगामात जेव्हा ७३ धावा पूर्ण करेल तेव्हा आयपीएलमध्ये २००० धावा आणि १०० विकेट्स त्याच्या नावावर असतील. आतापर्यंत आयपीएलमध्ये एकाही अष्टपैलू क्रिकेटपटूला २००० धावा आणि १०० विकेट्स आयपीएलमध्ये मिळवता आलेल्या नाहीत. आतापर्यंत जडेजा आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाबरोबर राजस्थान रॉयल्स, कोची टस्कर्स आणि गुजरात लायन्स या संघांकडूनही खेळला आहे.

वाचा-

जडेजाच्या नावावर आतापर्यंत १९२७ धावा आणि १०८ विकेट्स आहेत. पण चेन्नईच्या संघाकडून खेळताना जडेजाने प्रत्येक हंगामात १० पेक्षा जास्त बळी मिळवले आहे. चेन्नईकडून खेळताना ४८ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यामुळे या हंगामात खेळताना जडेजा ७३ धावा पूर्ण करून इतिहास कधी रचतो, याकडे चाहत्यांचे आता लक्ष लागलेले आहे.

वाचा-

जडेजाबरोबर चेन्नईचा एका अष्टपैलू खेळाडूलाही हा विक्रम खुणावत आहे. चेन्नईच्या शेन वॉटसनने आतापर्यंत आयपीएलमध्ये ३५७५ धावा केलेल्या आहेत, त्याचबरोबर त्याच्या नावावर ९२ विकेट्सही आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वप्रथम २००० हजार धावा आणि १०० विकेट्स पटकावण्याचा मान शेनलाही मिळू शकतो. पण शेनने गेल्या मोसमात एकही चेंडू टाकला नव्हता. वाढत्या वयानुसार शेनने गोलंदाजी करणे बंद केले आहे. पण या मोसमात जर त्याने गोलंदाजी केली तर तोदेखील हा इतिहास रचू शकतो.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here