करोनाशी लढण्यासाठी ज्या लोकांनी मेहनत घेतली आहे त्यांच्यासाठी आता विराट कोहलीचा आयपीएलमधील आरसीबीचा संघ पुढे आलेला आहे. कोव्हिड योद्ध्यांसाठी विराट कोहलीचा संघ एक खास जर्सी वापरणार असल्याचे आता समोर आले आहे. यावर्षी आयपीएलमधील संपूर्ण मोसमामध्ये कोहलीचा संघ कोव्हिड योद्ध्यांसाठी ही खास जर्सी वापरणार आहे.

वाचा-

यावर्षीच्या आयपीएलमध्ये तुम्हाला कोहलीच्या आरसीबीच्या संघाची एक नवीन जर्सी दिसणार आहे. या जर्सीवर माझे कोव्हिड हिरो, असे लिहिण्यात आले आहे. करोनामध्ये लोकांना मदत करणाऱ्या सर्व लोकांना सलाम करण्यासाठी कोहलीच्या आरसीबी संघाने हे एक महत्वाचे पाऊल उचलले आहे.

वाचा-

करोनामुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे करोनाच्या काळात सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी रस्त्त्यावर उतरणाऱ्या या योद्ध्यांसाठी काही तरी करायला हवे, असे आरसीबी संघाला वाटत होते. त्यामुळे आरसीबीच्या संघाने आपला हा पूर्ण मोसम जर्सीच्या माध्यमातून कोव्हिड योद्ध्यांना समर्पित केला आहे. त्यामुळे या आयपीएलच्या हंगामात नवीन जर्सीसह आरसीबीचा संघ तुम्हाला मैदानात दिसणार आहे.

वाचा-

याबाबत आरसीबी संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला की, ” करोनाच्या काळात रात्र-दिवस काही व्यक्ती सर्वसामान्य जनतेला मदत करत होते. त्यांनी लोकांची काळजी घेत करोनाचा प्रसार थांबवण्याचा प्रयत्न केला. या सर्व कोव्हिड योद्ध्यांना सलाम ठोकण्यासाठी आम्ही एक अनोखी गोष्ट करत आहोत. यावर्षी आम्ही त्यांच्यासाठी एक खास जर्सी घालून मैदानात उतरणार आहोत. आम्हाला या सर्व कोव्हिड योद्ध्यांचा गर्व आहे.”

वाचा-

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू (Royal Challengers Bangalore) संघ आपल्या पहिल्या विजेतेपदासाठी जोरदार तयारी करत आहे. आयपीएलच्या १२ हंगामात विराटची कामगरी शानदार आहे. पण त्याला कधी विजेतेपद मिळवता आले नाही. या वर्षी विराट आणि कंपनी जेतेपदासाठी मैदानात अधिक ताकदीने उतरणार आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धाव करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याचा सोबत आफ्रिकेचा एबी डिव्हीलियर्स देखील आहे. या दोघांनी अनेक सामन्यात शानदार विजय मिळवून दिला आहे. पण RCBला कधी विजेतेपद मिळवता आला नाही. या वर्षी आयपीएल सुरू होण्याआधी विराट आणि कंपनी जोरदार तयारी करत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here