वाचा-
जडेजाने या सन्मानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने चेन्नई संघासाठी दिलेल्या योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. चेन्नईचा कर्णधार धोनीच्या हस्ते जडेजाला हा पुरस्कार दिला गेला.
वाचा-
जडेजाने आयपीएलमध्ये १००हून अधिक विकेट घेतल्या आहेत. तर १ हजार ९०० धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे. जडेजाने २०१९ मध्ये १५ विकेट घेतल्या होत्या आणि त्याची सरासरी फक्त ६.३५ इतकी होती. चेन्नईने फक्त जडेजा नाही तर २०१९च्या आयपीएलमध्ये ज्यांनी शानदार कामगिरी केली त्यांचा देखील सन्मान करण्यात आला.
वाचा-
कर्णधार धोनीला नेतृत्व आणि सर्वाधिक धावा केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. त्याने २०१९ साली ८३.२०च्या सरासरीने ४१५ धावा केल्या होत्या. धोनीने २३ षटकार आणि २२ चौकार मारले होते.
शेन वॉट्सनला मुंबई विरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात खेळलेल्या शानदार खेळीसाठी पुरस्कार देण्यात आला. पायातून रक्त येत असताना देखील वॉट्सन मैदानावर चेन्नईच्या विजयासाठी खेळत होता.
या शिवाय फलंदाजीचे कोच मायकल हसी यांचा सन्मान केला. तर प्रथमच संघात स्थान मिळवलेला सत्य साई किशोर याला जर्सी भेट देण्यात आली.
टी-२० क्रिकेटमध्ये ५०० विकेट घेणारा पहिला गोलंदाज ड्वेन ब्रावोला एक विशेष पुरस्कार दिला गेला. तो हॉटलमधील रुममधून कार्यक्रमात सहभागी झाला होता.
२०१९मध्ये चेन्नईकडून सर्वाधिक २६ विकेट घेणाऱ्या इमरान ताहिरला ट्रॉफी देण्यात आली. तो देखील क्वारंटाइनमध्ये आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times