वाचा-
आयपीएलच्या १३व्या हंगाम सुरू होण्यासाठी काही तास शिल्लक असताना जाणून घेऊयात स्पर्धेतील १० मोठे विक्रम….
१) IPLमधील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनी () आहे. धोनीने १७४ सामन्यापैकी १०४ मध्ये विजय मिळवला आहे. त्याची विजयाची टक्केवारी ५९.८ टक्के इतकी आहे. या बाबत सर्वाधिक विजय मिळवणारा मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा () दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने १०४ पैकी ६० मध्ये विजय मिळवला आहे. त्याची टक्केवारी ५७.७ टक्के इतकी आहे. तर विराट कोहलीची टक्केवारी ४४.५ टक्क इतकी आहे. त्याने ११० पैकी ४९ सामने जिंकले आहेत.
वाचा-
२) IPLमध्ये सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम विराट कोहली () च्या नावावर आहे. त्याने ५ हजार ४१२ धावा केल्या आहेत.
३) स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) च्या नावावर असून त्याने एकूण ४४ अर्धशतक केली आहेत.
४) आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा विक्रम ख्रिस गेल (Chris Gayle) च्या नावावर आहे. त्याने २०१३ साली पुणे संघाविरुद्ध नाबाद १७५ धावा केल्या होत्या.
वाचा-
५) स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या उभी करण्याचा विक्रम RCBच्या नावावर आहे. त्यांनी पुणे वॉरियर्सविरुद्ध २०१३ साली २० षटकात २६३ धावा केल्या होत्या.
६) आयपीएलमधील एक नकोसा वाटणारा विक्रम देखील RCBच्या नावावर आहे. विराटचा संघ २०१७ साली KKR विरुद्ध १३२ धावांचा पाठलाग करताना फक्त ४९ धावांवर बाद झाला.
७) वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने आयपीएलमध्ये सर्वाधिक ६ शतक झळकावली आहेत.
वाचा-
८) आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी गोलंदाज मुंबई इंडियन्सचा लसित मलिंगा (Lasith Malinga) आहे. त्याने १७० विकेट घेतल्या आहेत. पण या वर्षी मलिंगा खेळणार नाही.
वाचा-
९) आजपर्यंत झालेल्या १२ हंगामात सर्वात जास्त पराभव झालेला संघ म्हणजे दिल्ली कॅपिटल्स होय. दिल्लीने आयपीएलमध्ये ९७ सामने गमावले आहेत.
१०) मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये सर्वाधिक १०७ सामन्यात विजय मिळवण्याचा विक्रम केला आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times