टोरंटो: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार () त्याच्या फलंदाजीसाठी ओळखला जातो. पण १८ सप्टेंबर रोजी गांगुलीने फलंदाजी नव्हे तर गोलंदाजीमध्ये कमाल केली होती. पाकिस्तानविरुद्ध १९९७ साली झालेल्या एका सामन्यात गांगुलीने गोलंदाजीद्वारे भारताला विजय मिळवून दिला होता.

वाचा-
भारत आणि पाकिस्तान () यांच्यातील प्रत्येक सामना हा हायव्होटेज असतो. टोरंटो येते भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वनडे मालिकेत तिसऱ्या सामन्यात गांगुलीने केलेली कामगिरी आज देखील चाहत्यांना आठवते. या सामन्यात भाराने प्रथम फलंदाजी करत ३६.५ षटकात फक्त १८२ धावा केल्या. गांगुलीला या सामन्यात फक्त २ धावा करता आल्या. भारताकडून मोहम्मद अझरूद्दीनने सर्वाधिक ६७, रॉबिन सिंहने नाबाद ३२ तर राहुल द्रविडने २५ धावा केल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानचा संघ फक्त १४८ धावांवर बाद झाला आणि भारताने सामना ३४ धावांनी जिंकला.

वाचा-
पाहा व्हिडिओ-

वाचा-
१८३ धावांचे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या पाकला सईद अन्वर आणि शाहिद आफ्रिदीने चांगली सुरूवात करून दिली. त्यांनी परिल्या विकेटसाठी ५२ धावा केल्या. पण त्यानंतर विकेट पडण्यास जी सुरुवात झाली ती थांबलीच नाही. गांगुलीने पाकिस्तानच्या फलंदाजींची झोप उडवली त्याने १० षटकात फक्त १६ धावा देत ५ विकेट घेतल्या.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here