नवी दिल्ली: भारतातील आघाडीची स्पोर्ट्स अँकर आणि क्रिकेटपटू यांना मुलगा झाला. आजच मयंती लँगर आयपीएलच्या १३व्या हंगामात अँकर करताना दिसणार नाही असे वृत्त आले होते. त्यानंतर काही वेळातच मयंतीला मुला झाल्याची बातमी आली. मयंतीने स्वत: सोशल मीडियावरून ही बातमी सर्वांना दिली.

वाचा-

वाचा-
आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी जेव्हा अँकरीच घोषणा झाली तेव्हा सर्वांना धक्का बसला होता. कारण अँकरच्या यादीत मयंती लँगरचे नाव नव्हते. स्टारने देखील एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मयंती या वर्षी आयपीएलमध्ये अँकर असणार नाही असे सांगितले. पण त्यांनी कारण सांगितले नाही.

वाचा-
त्यानंतर मयंतीच्या ट्विटमुळे ती या वर्षी आयपीएलमध्ये का दिसणार नाही याचे कारण समोर आले. मयंतीने स्वत: ट्विट करून ही गोड बातमी दिली.

वाचा-
मयंती आणि स्टुअर्ट यांनी २०१२ साली विवाह केला होता. मयंतीने आतापर्यंत फुटबॉल, आयपीएल आणि क्रिकेट वर्ल्ड कप सारख्या स्पर्धामध्ये अँकरिंग केले आहे. स्टुअर्ट बिन्नीने भारताकडून ६ कसोटी, १४ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळले आहेत.

वाचा-
मयंतीच्या जागी स्टार स्पोर्ट्सने नव्या महिला अँकरना संधी दिली आहे. यात ऑस्ट्रेलियाची नेरोली मिडोससह सुरेन सुंदरम, किरा नारायणन, नशप्रीत कौर, संजना गणेशन, तान्या पुरोहीत यांना संधी दिली आहे.

भारतीय क्रिकेट विश्वात या वर्षी अनेक खेळाडूंनी गुड न्यूज दिल्या आहेत. या वर्षी सुरेश रैनाला दुसरे बाळ झाले. सुरेश रैनाला मार्च महिन्यात मुलगा झाला होता. त्याला २०१६ मध्ये पहिली मुलगी झाली होती. त्यानंतर हार्दिक पांड्याने विवाह आणि गुड न्यूज एकत्र दिली. काही दिवसांपूर्वी त्याला मुलगा झाला. तर चहल आणि विजय शंकर यांनी आयपीएलला रवाना होण्याआधी साखरपुडा उरकला होता.

तर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी २७ ऑगस्ट रोजी आई-वडील होणार असल्याचे सोशल मीडियावरून सांगितले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here