नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिला वर्ल्ड कप, सचिनचे १०० शतक, धोनीच्या नेतृत्वाखाली मिळवलेला दुसरा वर्ल्ड कप असे अनेक क्षण सुवर्ण अक्षरात लिहले जातील. पण या सर्वांमध्ये एक क्षण असा आहे ज्याचे स्थान जागतिक क्रिकेटमध्ये देखील वरच्या क्रमांकाचे आहे.

वाचा-
भारताचा माजी ऑलराउंडर खेळाडू युवराज सिंगने टी-२० वर्ल्ड कपमधील एकाच सामन्यात ६ चेंडूत ६ मारण्याचा पराक्रम केला होता. युवराजच्या या विक्रमाला आज १३ वर्ष झाली आहेत. आजच्या दिवशी युवीने डरबन मैदानावर ही कामगिरी केली होती.

वाचा-
या वर्ल्डकपमध्ये युवराजने इंग्लंडविरुद्ध खेळताना अँड्र्यू फ्लिंटऑफ बरोबर भांडण झाले. त्यानंतर भडकलेल्या युवराजने स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकाच्या सहाच्या सहा चेंडूंवर षटकार ठोकले. याच सामन्यात त्याने सर्वात जलद अर्धशतकही केले होते. युवराजने १२ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या.

वाचा-

… तर घडले असे की

युवराज आणि महेंद्रसिंग धोनी हे दोघे त्यावेळी फलंदाजी करत होते. अँड्र्यू फ्लिंटऑफ त्यावेळी गोलंदाजी करत होता. युवराजने त्याच्या षटकार खणखणीत दोन चौकार लगावले. हे षटक संपल्यावर युवराज धोनीबरोबर बातचीत करण्यासाठी चालत पुढे गेला होता. त्यावेळी फ्टिंटॉफ युवराजसमोर आला. त्यावेळी त्याने युवराजला काही अपशब्दही वापरले. कारण त्याच्या चांगल्या चेंडूवर युवराजने चौकार लगावले होते. त्यामुळे त्याने युवराजला रागात म्हटले की, ” तु बाहेर आलास ना तर तुझा गळा कापेन.”

वाचा-

भारताकडून १९८५ साली रवी शास्त्री यांनी एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स मारले होते. तेव्हा अशी कामगिरी करणारे ते पहिले भारतीय फलंदाज ठरले होते.जागतिक क्रिकेटमध्ये रवी शास्त्रींच्या आधी अशी कामगिरी वेस्ट इंडिजच्या गॅरी सोबर्स (Garry Sobers) यांनी केली होती. सोबर्स यांनी १९६८मध्ये सहा चेंडूत सहा षटकार मारले होते.

वाचा-

२००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्सने युवराजच्या आधी एकाच षटकात सहा सिक्स मारले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी सर्वप्रथम गिब्सने केली. त्यानंतर आठ वर्षांनी २०१५मध्ये इंग्लंडच्या अॅलेक्स हेल्सने काऊंटी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा सिक्स मारले.

वाचा-
२०१८मध्ये अफगाणिस्तानच्या हजरातुल्ला जजईने अफगाणिस्तान प्रीमिअर लीग स्पर्धेत सहा चेंडूत सहा षटकार मारले. त्यानंतर न्यूझीलंडच्या लिओ कार्टने सुपर स्मॅश स्पर्धेत एकाच षटकात सहा सिक्स मारण्याचा पराक्रम केला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here