अबूधाबी: आयपीएलच्या पहिल्या सामन्याला काही तासात सुरूवात होईल. मुंबई आणि चेन्नई या दोन संघात पहिला सामना खेळवला जाईल. दोन्ही संघातील खेळाडू जोरदार तयारी करत आहेत. आयपीएलमधील हे दोन्ही संघ सर्वात यशस्वी आहेत. त्यामुळे लढत चुरशीची होईल यात शंका नाही. या सामन्यासाठी मुंबईचा एक खेळाडू जोरजार तयारी करत आहे. त्याच्या तयारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा-
चेन्नई विरुद्धच्या सामन्यात मुंबईचे पारडे जड आहे. मुंबईकडे काही असे खेळाडू आहेत जे अखेरच्या क्षणी सामना फिरवू शकतात. असाच एक खेळाडू म्हणजे हार्दिक पंड्या होय. मुंबई संघाने हार्दिकचा नेट मधील सरावाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो जोरदार फटकेबाजी करताना दिसतोय.

वाचा-
फक्त ४९ मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये हार्दिक सुरुवातीला बचावात्मक पद्धतीने खेळतो. पण त्यानंतर एकापाठोपाठ एक मोठे शॉट खेळण्यास सुरूवात करतो. हार्दिकचा प्रत्येक चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय.

वाचा-

वाचा-
हार्दिकच्या या व्हिडिओवरून हे स्पष्ट दिसत आहे की यावर्षी त्याच्याकडून चौकार आणि षटकारांचा पाऊस नक्की पडले.

वाचा-
आयपीएलमधील या दोन्ही संघाच्या कामगिरीवर नजर टाकली तर दोन्ही संघात आतापर्यंत २८ सामने झाले आहेत. त्यापैकी चेन्नई संघाने ११ तर मुंबई संघाने १७ सामने जिंकले आहेत. पण गेल्या सात हंगामात विद्यमान विजेता मुंबई संघाला पहिला सामन्यात कधीच विजय मिळवता आला नाही. मुंबई संघाला आज हा इतिहास बदलावा लागले. २०१२ पासून मुंबई संघाला पहिल्या सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. तर चेन्नई संघाने गेल्या तीन सामन्यात विजय मिळवला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here