आबुधाबी : प्रत्येक स्पर्धेचा पहिला सामना हा सर्वात महत्वाचा असतो. कारण पहिल्या सामन्यावर सर्वांच्याच नजरा टिकून राहिलेल्या असतात. त्यामुळे स्पर्धेची सुरुवात नेमकी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष असते. आतापर्यंतच्या सलामीच्या लढतीत प्रथम फलंदाजी करणारा संघ किती वेळा जिंकला आहे, ते आपण पाहूया…

आयपीएलच्या पहिल्या मोसमाला २००८ साली सुरुवात झाली होती. या मोसमातील पहिल्या सामन्यात ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली होती, त्यांनाच विजय मिळाला असल्याचे पाहायला मिळाले होते. या मोसमाचे जेतेपद राजस्थान रॉयल्सने पटकावले होते. आयपीएलच्या दुसऱ्या हंगामातही हीच गोष्ट पाहायला मिळाली होती. या हंगामातील पहिल्या सामन्यात ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली होती, त्यांनीच सलामीची लढत जिंकल्याचे पाहायला मिळाले होते. २००९ साली झालेल्या दुसऱ्या हंगामाचे जेतेपद डेक्कन चार्जर्सने पटकावले होते.

आयपीएलचा तिसरा हंगाम २०१० साली खेळवला गेला. या हंगामाच्या सलामीच्या लढतीत ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली होती, त्यांनाच विजय मिळाल्याचे समोर आले होते. या मोसमाचे जेतेपद चेन्नई सुपर किंग्स संघाने पटकावले होते. आयपीएलच्या चौथ्या हंगामातही ज्या संघाने सलामीच्या लढतीत प्रथम फलंदाजी केली होती, त्यांनीच सामना जिंकला होता. २०११ साली झालेल्या या आयपीएलचे जेतेपद सलग दुसऱ्यांदा चेन्नई सुपर किंग्स संघाने जिंकले होते.

आयपीएलच्या सलामीच्या लढतीत आतापर्यंत प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकत होता. पण या गोष्टीला तडा मिळाल्याचे २०१२ साली पाहायला मिळाले. कारण २०१२ साली झालेल्या आयपीएलच्या सलामीच्या लढतीत दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ विजेता ठरला होता. २०१२ साली आयपीएलचे जेतेपद कोलकाता नाइट रायडर्स संघाने जिंकलेले होते. २०१३ साली झालेल्या हंगामात सलामीच्या लढतीत दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ जिंकला होता. या हंगामाचे जेतेपद मुंबई इंडियन्सने पटकावले होते. २०१४ साली झालेल्या आयपीएलच्या सातव्या हंगामात मात्र ही गोष्ट पुन्हा बदलेली पाहायला मिळाली. कारण या हंगामाच्या सलामीच्या लढतीत प्रथम फलंदाजी करणारा संघ विजेता ठरला होता. या हंगामाचे जेतेपद चेन्नईने पटकावले होते.

आयपीएलच्या २०१५ साली झालेल्या हंगामातील सलामीच्या लढतीत दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ जिंकला होता. या हंगामाचे जेतेपद मुंबईने आपल्या नावावर केले होते. २०१६ साली झालेल्या आयपीएलच्या सलामीच्या लढतीत दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ विजयी ठरला हता, या हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने जेतेपद पटकावले होते. आयपीएलच्या २०१७ साली झालेल्या हंगामाच्या सलामीच्या लढतीत प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी ठरला होता, यावेळी जेतेपदाला मुंबईच्या संघाने गवसणी घातलेली होती.

आयपीएलच्या गेल्या दोन हंगामांमधील सलामीच्या लढतीत नेमके काय झाले आहे. ते आपण पाहूया… आयपीएलच्या २०१८ साली झालेल्या सलामीच्या लढतीमध्ये दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने सामना जिंकला होता. या मोसमामध्ये चेन्नईने जेतेपद पटकावले होते. आयपीएलच्या गेल्या हंगामातील सलामीच्या लढतीत दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवलेला होता. गेल्यावर्षी मुंबई इंडियन्सने आपले चौथे जेतेपद पटकावले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here