अबूधाबी: आयपीएलचे सर्वाधिक विजेतेपद मिळवणाऱ्या संघाचा पुन्हा एकदा पहिल्या सामन्यात पराभव झाला. गेल्या आठ हंगामापासून मुंबई संघाने हंगामातील पहिला सामना गमवला आहे. मुंबई संघाने २०१२ साली अखेरचा हंगामातील पहिला सामना जिंकला होता.

वाचा-
काल अबूधाबीमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबईचा ५ विकेटनी पराभव केला. मुंबईने सात वर्षापासून सुरू असलेल्या इतिहासाती पुनरावृत्ती केली. २०१३ साली पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने मुंबईचा पहिल्या सामन्यात पराभव केला होता. त्यानंतर २०१४ आणि २०१५ मध्ये केकेआरने, २०१६, २०१७ मध्ये पुणे संघाने, २०१८ मध्ये चेन्नई, २०१९ साली डेक्कन चार्जसने आणि आता पुन्हा धोनीच्या चेन्नई संघाने मुंबईचा पहिल्या सामन्यात पराभव केला.

वाचा-

अर्थात या पहिल्या पराभवामुळे मुंबईचे चाहते निराश झाले नाही. त्यांनी चार वेळा विजेतेपद मिळवले आहे. रोहित आणि कंपनी पुन्हा एकदा चॅम्पियन होईल असा विश्वास चाहत्यांना वाटतो.

वाचा-

चेन्नई विरुद्धच्या सामन्यात झालेल्या चुका दुरुस्त करून आणि पुढील सामन्यात आम्ही कमबॅक करू असा विश्वास रोहित शर्माने व्यक्त केला.

वाचा-

पहिल्या सामन्यातील पराभव लकी ठरणार?रोहितच्या संघाची सुरुवात पराभवाने झाली असली तरी गेल्या आठ वर्षात त्यांनी ४ वेळा विजेतेपद मिळवले आहे. त्यामुळेच हा पहिला पराभव मुंबईसाठी लकी ठरले का, अशीच चर्चा सुरू झाली आहे. आयपीएलच्या इतिहासात अनेक संघ सुरुवातीच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर जोरदार कमबॅक करतात.

धोनीने विजयाचा दुष्काळा घालवला
मुंबई विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून धोनीने विजयाचा दुष्काळ घालवला. या आधी मुंबईविरुद्ध सलग पाच सामन्यात त्यांचा पराभव झाला होता. आता मुंबई इंडियन्सची पुढील लढत बुधवारी कोलकाताविरुद्ध होणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here