प्रत्येक संघाला आपला पहिला सामना हा सर्वात महत्वाचा असतो. कारण पहिल्या सामन्यात सर्व आलबेल असेल तर त्यानंतर जास्त समस्या संघाला जाणवत नाहीत. पण दिल्लीच्या एका खेळाडूला दुखापत झाल्याचे समजत आहे. त्याच्यावर उपचारही सुरु आहेत. त्यामुळे आजच्या पहिल्या सामन्यात तरी हा खेळाडू दिसणार नाही, असे म्हटले जात आहे.
दिल्लीच्या संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज इशातं शर्माला दुखापत झालेली आहे. सामन्यासाठी सराव करत असाना इशांतच्या पाठिला दुखापत झाली आहे. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचे समजते आहे. त्यामुळे आजच्या पहिल्या सामन्यात तरी इशांत दिल्लीकडून खेळताना आपल्याला दिसणार नाही. कागिसो रबाडाबरोबर इशांत दिल्लीच्या वेगवान माऱ्याची सुरुवात करणार होता. पण इशांत जर जायबंदी असेल तर त्याच्याजागी कोणाला मैदानात खेळवायचे, याचा निर्णय दिल्लीच्या संघाला त्वरीत घ्यावा लागणार आहे.
इशांतच्या दुखापतीबाबत दिल्लीच्या संघाने अजूनपर्यंत अधिकृतपणे काही सांगितलेले नाही. पण टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार इशांतच्या पाठिला दुखापत झालेली आहे. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचे दिसत आहे. पण सामन्यापूर्वी इशांतची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीत जर इशांत फिट असेल तरच त्याला पहिल्या सामन्यात खेळवण्यात येऊ शकते.
इशांतला जर दुखापत झाली असेल तर पहिल्या सामन्यात त्याला खेळवण्याची जोखीम दिल्लीचा संघ उचलणार नाही. कारण आयपीएल जवळपास दोन महिने चालणार आहे. आता जर इशांतला खेळवले आणि तो पुन्हा जायबंदी झाला तर त्याला जास्त सामन्यांना मुकावे लागू शकते. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी इशांतला विश्रांती देण्यावर संघाचा भर असेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times