आयपीएलचा पहिला सामना सुरु होण्यापूर्वीच किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल हा हटके अंदाजामध्ये पाहायला मिळाला आहे. कारण गेलने सामना सुरु होण्यापूर्वीच एक हॉट व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे यावर्षी आयपीएल गाजवायला गेलने पहिल्या सामन्यापूर्वीच सुरुवात केली आहे, असे म्हटले जात आहे.

काही दिवसांपूर्वी गेल एका पार्टीमध्ये गेला होता. त्यावेळी तिथल्या पार्टीतील एका खेळाडूला करोना झाला होता. त्यानंतर आपण या वर्षी कुठेही बाहेर जणार नसल्याचे गेलने सांगितले होते. त्यामुळेच तो कॅरेबियन प्रमिअर लीगही खेळला नव्हता. पण आता आयपीएलमध्ये धमाल करण्यासाठी गेल सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण गेलने आयपीएलपूर्वीच एक व्हिडीओ बनवला असून तो आता चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

गेलने हा व्हिडीओ ब्रिटिश-भारतीय गायिका अविना शाहबरोबर बनवलेला आहे. या गाण्याची चाल तुम्ही ऐकली तर नक्कीच तुमचेही पाय थिरकतील. कारण या गाण्यामध्ये भारतीय, जमैकन आणि ब्रिटीश या तिन्ही संगीतांचे मिश्रण करण्यात आलेले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ भारतीयांना नक्कीच आवडेल, असे म्हटले जात आहे. या व्हिडीओला ग्रुव्ह असेल नाव देण्यात आले आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनच्या काळात विविध देशांमध्ये या व्हिडीओचे शुटींग करण्यात आले आहे.

गेलच्या नावावर आयपीएलमधील बरेच विक्रम आहेत. त्यामुळे यावर्षी गेल नेमका कोणता विक्रम रचतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पहिल्या सामन्यात गेल कशी धडाकेबाज फलंदाजी करतो, याची उत्सुकता आता चाहत्यांना लागलेली आहे.

यावेळी आयपीएल खेळत असताना स्टेडियममध्ये चाहते नसतील, पण त्यांना आपल्या घरात राहूनच धमाल करण्याची संधी आता गेलने दिल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या व्हिडीओमधील गाण्यात जे संगीत वापरण्यात आले आहे, ते भारतीयांना आवडेल याचपद्धतीने करण्यात आलेले आहे. आतापर्यंत बऱ्याच चाहत्यांनी हा व्हिडीओ पाहिला असून तो त्यांच्या चांगलाच पसंतीस उतरलेला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here