वाचा-
पंजाबचा आज पहिलाच सामना दिल्लीबरोबर होणार आहे. पण या सामन्यापूर्वी एक समस्या पुढे आल्याचे पाहायला मिळत आहे. पंजाबच्या संघाला एक कोडे पडलेले आहे आणि हे कोडे कर्णधार राहुलच्याबाबतीत असल्याचे म्हटले जात आहे. या मोसमात पंजाबच्या संघाचे कर्णधारपद राहुलकडे सोपवण्या आले आहे. त्यामुळे राहुल या समस्येतून कसा मार्ग काढतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
गेल्या मोसमात पंजाबच्या सलामीची धुरा राहुल आणि ख्रिस गेल यांनी सांभाळलेली होती. पण यावेळी सलामीच्या जोडीमध्ये बदल केला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे. कारण सध्याच्या घडीला मयांक अगरवाल हा चांगल्या फॉर्मात दिसत आहे. त्यामुळे त्याला गेलबरोबर सलामीला पाठवायचे की गेलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आणायचे, याचा विचार सध्या पंजाबच्या संघात सुरु झालेला आहे. कारण फॉर्मात असलेल्या मयांकला सलामीची संधी दिली तर तो चांगल्या धावा करू शकतो, असे म्हटले जात आहे.
सलामीसाठी पंजाबकडे सध्या तीन पर्याय आहेत. पण त्यापैकी दोघांनाच सलामीला जाता येऊ शकते. राहुल हा भारताचा कर्णधार विराट कोहलीचा चांगला मित्र आहे. कोहली हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. त्यामुळे राहुलही यावेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. पण जर राहुल तिसऱ्या क्रमाकांवर फलंदाजीला आला नाही, तर मयांकला तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी यावे लागेल.
गेल्यावर्षी पंजाबच्या संघाकडून राहुल आणि गेल यांनीच सलामी दिली होती. त्यामुळे जर जास्त प्रयोग कराये नसतील तर या दोघांनाच पंजाबचा संघ सलामीला आणू शकतो. त्यामुळे आता पंजाबच्या डावाची सुरुवात कोण करणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली आहे. त्यामुळे पंजाबच्या फलंदाजीवर यावेळी सर्वांचीच नजर असेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times