राजस्थान रॉयल्सला पहिला सामना सुरु होण्यापूर्वीच एक मोठा धक्का बसला आहे. कारण राजस्थानच्या संघातील एक धडाकेबाज फलंदाज चेन्नईविरुद्धच्या सामन्यात खेळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राजस्थानचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्सबरोबर होणार आहे. या सामन्यात राजस्थानचा धडाकेबाज फलंदाज जोस बटलर खेळू शकणार नाही. बटलरने इंस्टाग्रान लाइव्हमधून ही माहिती सर्वांना दिली आहे.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना ३६ तासांचा क्वारंटाइन अवधी देण्यात आला होता. पण बटलर हा आपल्या कुटुंबियांबरोबर खासगी विमानाने आल्यामुळे त्याला आता सहा दिवस क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे.

वाचा-

बटलरने सांगितले की, ” सध्याच्या घडीला मी क्वारंटाइन झालेलो आहे. त्यामुळे मला राजस्थानचा पहिला सामना खेळता येणार नाही. त्यामुळे चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मी खेळणार नाही. आता राजस्थानच्या संघाला मी कधी भेटणार, असे मला झाले आहे. कारण आयपीएल सुरु झाली असून दमदार कामगिरी करण्यासाठी मी उत्सुक आहे.”

बटलर पुढे म्हणाला की, ” लॉकडाऊनच्या काळात मी कुटुंबियांबरोबर होतो. मला या गोष्टीची चांगलीच मदत झाली. गेले काही दिवस माझ्यासाठी आनंददायी होते. पण सध्याच्या घडीला मी क्वारंटाइनमध्ये असल्यामुळे चेन्नईविरुद्धचा पहिला सामना तरी मला खेळता येणार नाही. पण त्यानंतर मी काही अवधीतच राजस्थान संघाचा एक भाग असेन, असा मला विश्वास आहे.”

पंजाबच्या संघाने आपल्या चाहत्यांना पहिल्याच सामन्यात धक्का दिला आहे. पहिल्याच सामन्यात पंजाबच्या संघाने धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलला न खेळवण्याचा निर्णय घेतलेला आहे. कर्णधार लोकेश राहुलने पहिल्याच सामन्यात हा धक्कादायक निर्णय घेतलेला आहे. गेल्यावर्षी गेल आणि राहुल यांनी दमदार फलंदाजी केली होती. या हंगामात ही जोडी पुन्हा एकदा दिसेल, असे वाटले होते. पण पहिल्याच सामन्यात गेलला पंजाबच्या संघाने वगळलेले पाहायला मिळत आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाने आपल्या पहिल्याच सामन्यात मुंबईकर अजिंक्य रहाणेला वगळल्याचे पाहायला मिळत आहे. संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक झाल्यावर ही घोषणार केली. राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद अजिंक्यने भूषवले होते. पण यावर्षी तो दिल्लीच्या संघात दाखल झाला होता. पण या हंगामातील पहिल्याच सामन्यात अजिंक्यला वगळण्याचा निर्णय दिल्लीच्या संघाने घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here