दुबई: आयपीएलमध्ये अंपायरिंग हा एक मोठा मुद्दा ठरला आहे. खराब अंपायरिंगचा फटका अनेक खेळाडू आणि संघांना बसला आहे. अशीच घटना यावर्षीच्या दुसऱ्याच सामन्यात पाहायला मिळाली ज्यामुळे एका संघाचा पराभव झाला.

वाचा-
दुबईत काल आणि यांच्यात सामना झाला. या सामन्यात पंजाबला विजयासाठी १० चेंडूत २१ धावांची गरज होती. कगिसो रबाडाच्या ओव्हरमध्ये दुसऱ्या चेंडूवर मयांक अग्रवालने चौकार मारला आणि त्यानंतर यॉर्कर चेंडू मिड-ऑनच्या दिशेने मारला. मयांक सोबत असलेल्या ख्रिस जॉर्डनने दोन धावा घेतल्या. पण स्क्वेअर लेगला उभे असलेले अंपायर नितीन मोहन यांनी एक रन शॉर्ट दिली. त्यांच्या मते जॉर्डनने धाव घेताना बॅट क्रीझला लावली नाही.

वाचा-
दिल्लीने प्रथम फलंदाजी करत ८ बाद १५७ धावा केल्या होत्या. दिल्लीकडून स्टॉयनिसने २१ चेंडूत ५३ धावांची धमाकेदार खेळी केली. त्यानंतर मयांक अग्रवालने ६० चेंडूत ८९ धावा केल्या आणि विजयाजवळ पोहोचवले. शेवटच्या ओव्हरमध्ये पंजाबला विजयासाठी १३ धावांची गरज असताना स्टॉयनिसने सामना टाय करून दिला. नंतर सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने विजय मिळवला.

वाचा-
पण या सामन्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली ती अंपायरच्या खराब निर्णयाबद्दल. आयपीएलमध्ये पंजाब आणि दिल्लीकडून खेळलेला भारताचा माजी धडाकेबाज खेळाडू म्हणाला, मॅन ऑफ द मॅच पुरस्काराबद्दल मी सहमत नाही. ज्या अंपायरने शॉर्ट रन दिली त्यांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला पाहिजे. त्यामुळेच अंतर पडले.

वाचा-

भारताचा माजी जलद गोलंदाज इरफान पठाणने देखील यावर सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली आहे.

न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू स्कॉट स्टायरिसने आज आयपीएलमध्ये एक रन शॉर्ट देण्याचा निर्णय प्रचंड खराब होता. जर शेवटच्या दोन चेंडूवर एक धाव हवी असेल आणि तुम्ही विजय मिळवला नाही तर स्वत:ला दोष देऊ शकत नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here