दुबई: आयपीएलमधील पहिले दोन्ही सामन्यात प्रचंड चुरस पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात अखेरच्या षटकापर्यंत लढत झाली. तर आणि पंजाब यांच्यातील सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. आयपीएलच्या इतिहासातील हा १०वा सुपर ओव्हरमध्ये गेलेला सामना ठरला.

वाचा-
दोन्ही संघांनी २० षटकात १५७ धावा केल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करत मार्कस स्टॉयनिसच्या धमाकेदार खेळीने १५७ पर्यंत मजल मारली. दिल्लीची सुरुवात इतकी खराब झाली होती की, अर्धा सामना त्यांनी जवळजवळ गमावला होता. पण स्टॉयनिसच्या फलंदाजीने त्यांना किमान लढत देणारी धावसंख्या उभी करता आली.

वाचा-
पंजाब वरचढ वाटत असताना दिल्लीच्या गोलंदाजांनी पंजाबची अवस्था ५ बाद ५५ अशी केली. पण मयांक अग्रवालने धमाकेदार खेळी केली आणि विजयाजवळ पोहोचवले. अखेरच्या षटकात १३ धावांची गरज असताना स्टॉयनिसने १२ धावा देत सामना टाय केला. आयपीएलमधील दुसरच सामना सुपर ओव्हरमध्ये गेल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली.

वाचा-

दिल्लीकडून रबाडाने सुपर ओव्हर टाकली आणि ती खऱ्या अर्थाने टर्निंग पॉइंट ठरला. त्याने फक्त दोन धावा दिल्या आणि दोन विकेट घेतल्या. विजयासाठीचे ३ धावांचे लक्ष्य दिल्लीने सहज पार करत पहिल्या विजयाची नोंद केली.

दिल्ली आणि पंजाब यांच्यातील सुपर ओव्हर पाहण्यासाठी करा.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here