नवी दिल्ली: युएईमध्ये आयपीएलच्या १३व्या हंगामाचा थरार सुरू झाला आहे. पहिल्या दोन्ही चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. जागतिक क्रिकेटमध्ये आयपीएल सोबत सध्या इंग्लंडमध्ये टी-२० लीग क्रिकेट सुरू आहे. या सामन्यातील एका गोलंदाजाने खळबळ उडवून दिली.

पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन आफ्रीदीने विटाविटी ब्लास्ट टी-२० लीग स्पर्धेत चार चेंडूत चार विकेट घेतल्या. हॅमशर काउंटीकडून खेळताना त्याने मिडलसेक्सच्या चार फलंदाजांना आउट केले. शाहीनच्या या गोलंदाजीचे खास वैशिष्ट म्हणजे, त्याने चार चेंडू यार्कर टाकले आणि चार बोल्ड घेतले.

वाचा-

वाचा-
पहिल्या चेंडूवर त्याने जॉन सिम्पसन, नंतर स्टीव्ह फिन, थिलन वालाविता आणि टीम मुरताग यांना बाद केले. संपूर्ण सामन्यात त्याने १९ धावात ६ विकेट घेतल्या. हॅपशर काउंटीकडून कोणत्याही गोलंदाजाने केलेली ही सर्वोत्तम गोलंदाजी आहे.

वाचा-

वाचा-
विशेष म्हणजे या सामन्याआधी शाहीनने संपूर्ण स्पर्धेत १९१ धावा देत फक्त एक विकेट घेतली होती. पण या सामन्यात त्याने सर्व कसर भरून काढली. हॅपशर संघाने २० षटकात ९ बाद १४१ धावा केल्या. मिडलसेक्स धावा करण्याचा प्रयत्न केला. मात्र शाहीनच्या गोलंदाजीपुढे ते १२१ धावांवर ऑल आउट झाले. या हंगामातील हॅपशरचा हा पहिला विजय ठरला.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here