दुबई: IPL 2020 आयपीएलच्या प्रत्येक हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ नेहमीच कागदावर मजबूत दिसतो. पण या संघाला कधीच विजेतेपद मिळवता आले नाही. विराटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बेंगळूरू संघाने दोन वेळा फायनलपर्यंत धडक मारली पण विजेतपदाने हुकावणी दिली. हा इतिहास बदलण्यासाठी आजपासून विराट सेने मैदानात उतरले. तर दुसऱ्या बाजूला सनरायझर हैदराबाद संघाबद्दल फार चर्चा होत नाही. पण या संघाने २०१६ विजेतपद आणि २०१८ मध्ये उपविजेतेपद मिळून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

वाचा-
बेंगळुरू संघात , एबी डीव्हिलियर्स, ऑरोन फिंच सारखे मोठे खेळाडू आहेत तर हैदराबादकडे डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो आणि रशिद खान ही सामना फिरवणारे खेळाडू आहेत.

वाचा-
विराट कोहली आणि डिव्हिलियर्स यांची आयपीएलमधील कामगिरी शानदार अशी राहिली आहे. या दोघांनी अनेक सामन्यात एकहाती विजय मिळून दिला आहे. आता त्यांना विजेतेपदाचे स्वप्न पूर्ण होईल अशी कामगिरी करावी लागेल. अर्थात या दोघांना फिरकीपटूंचा त्रास होऊ शकतो. हैदराबादकडे रशिद खान सारखा जागतिक दर्जाचा फिरकीपटू आहे. ज्याने टी-२० आतापर्यंत धमाकेदार अशी कामगिरी केली आहे. त्यामुळे बेंगळूरूच्या लढतीत रशिद खान हा महत्त्वाचा खेळाडू ठरेल.

वाचा-
IPL मध्ये हे दोन्ही संघ आतापर्यंत १५ वेळा लढले आहेत. त्यापैकी ६ वेळा बेंगळूरूने तर ८ वेळा हैदराबादने विजय मिळवला आहे. तर एक सामना अनिर्मित झाला आहे.

वाचा-

अशी असेल खेळपट्टी

खेळपट्टी फिरकीपट्टूला अनुकूल राहण्याची अधिक शक्यता आहे. जो खेळाडू सुरुवातीला संयमी फलंदाजी करेल तो धावा काढू शकेल. याच मैदानावर काल दिल्ली आणि पंजाब यांच्यातील लढत झाली होती. पण आजच्या सामन्यात दुसरे पिच वापरले जाऊ शकते.

वाचा-

संभाव्य संघ

सनरायजर्स हैदराबाद- डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो (विकेटकिपर), मनीष पांडे, विजय शंकर, विटार सिंह, अब्दुल समद, मोहम्मद नबी, राशिद खान, खलील अहमद, संदीप शर्मा

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू- ऑरोन फिंच, देवदत्त पडीक्कल, विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, मोईन अली, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सुंदर, उमेश यादव, नवदीप सैनी आणि युजवेंद्र चहल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here