नवी दिल्ली: आयपीएलच्या १३व्या हंगामातील दुसराच सामना वादाचे कारण ठरला. आणि ( ) यांच्यात झालेल्या लढतीत अंपायरिंगवरून वाद झाला. यावर आता पंजाबची संघ मालकीन () ने नाराजी व्यक्त केली आहे.

वाचा-
रविवारी झालेल्या सामन्यात दिल्ली (Delhi Capitals) ने पंजाब (KIngs XI Punjab) समोर विजयासाठी १५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मयांक अग्रवालच्या धडाकेबाज खेळीने पंजाबने सामन्यात बरोबरी केली. पण अखेरच्या षटकात १३ धावांची गजर असताना पंजाबला १२ धावा करता आल्या. अखेरच्या दोन चेंडूवर विकेट गेली.

वाचा-
पण त्याआधी १९व्या षटकात अग्रवाल आणि ख्रिस जॉर्डन यांनी दोन धावा घेतल्या होत्या. त्यापैकी एक धाव अंपायरने शॉर्ट रन दिली. प्रत्यक्षात जॉर्डनने बॅट क्रीझवर टेकवली होती. ही एक धाव जर कमी झाली असती तर पंजाबला १२ धावांची गरज असती.

वाचा-

अंपायरच्या निर्णयावर प्रिती झिंटाने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. मी करोना व्हायरसच्या काळात पूर्ण उत्साहाने दुबईपर्यंत प्रवास केला. सहा दिवस क्वारंटाइन राहिले. पाच वेळा करोना चाचणी केली. पण त्या एका शॉर्ट रनचे वाईट वाटते. जर तंत्रज्ञानाचा उपयोग होत नसेल तर फायदा काय? हीच योग्य वेळे आहे की बीसीसीआयने नवे नियम आणावेत. प्रत्येक वर्षी असे होऊ शकत नाही.

वाचा-

वाचा-
दुसऱ्या एका ट्विटमध्ये प्रिती म्हणते, मी जय-पराजयाचा विनम्रतेने स्विकार करते. खेळ भावना अधिक महत्त्वाची आहे. पण खेळातील सुधारणेसाठी नियमात बदल करणे देखील गरजेचे आहे. जे झाले त्यातून आता पुढे गेले पाहिजे. मी देखील यातून पुढे जात असून नेहमी प्रमाणे सकारात्मक आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here