आयपीएलच्या हंगामाला आत्ताच कुठे सुरुवात झाली आहे. पण भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांची क्रिकेटमधील दूरदृष्टी सर्वांनाच परिचीत आहे. त्यामुळे आयपीएल एका खेळाडूचे कर्णधारपद धोक्यात असल्याचे मत गावस्कर यांनी केल्यावर बऱ्याच चाहत्यांना धक्का बसलेला आहे.

आतापर्यंत आयपीएलचे फक्त दोन सामने झाले आहे. या दोन सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब या संघांना पराभव पत्करावा लागला आहे. पण गावस्कर या दोन संघांची गोष्ट करताना दिसत नाहीत. तर युएईमध्ये यापूर्वी झालेल्या आयपीएलमध्ये जेतेपद पटकावलेल्या संघाबद्दल गावस्कर बोलत आहेत.

युएईमध्ये २०१४ साली आयपीएल खेळवण्यात आले होते. त्यावेळी कोलकाता नाइट रायडर्सने जेतेपद पटकावले होते. केकेआरच्या संघाबाबत गावस्कर यांनी एक टिप्पणी केली आहे. केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिकचे कर्णधारपद धोक्यात असल्याचे गावस्कर यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर दिनेशला जर कर्णधारपदावरून काढले तर कोणाकडे केकेआरचे नेतृत्व जाऊ शकते, हेदेखील गावस्कर यांनी स्पष्ट केले आहे.

गावस्कर यांनी सांगितले की, ” केकेआरचा संघ हा नक्कीच लक्षवेधी आहे. कारण त्यांच्याकडे आक्रमक फलंदाज आहे. पण गेल्या हंगामात केकेआरला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे या हंगामातील पहिल्या ४-५ सामन्यांमध्ये केकेआरला चांगली कामगिरी करता आली नाही तर संघाचे कर्णधारपद बदलले जाऊ शकते. त्यामुळे दिनेश कार्तिकच्या कर्णधारपदाला धोका संभवू शकतो.”

गावस्कर पुढे म्हणाले की, ” जर केकेआरची सुरुवात चांगली झाली नाही, तर कार्तिकचे कर्णधारपद धोक्यात येऊ शकते. हे कर्णधारपद संघातील इऑन मॉर्गनला मिळू शकते. कारण मॉर्गनकडे नेतृत्व करण्याचा चांगला अनुभव आहे. त्याचबरोबर मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने विश्वचषकही जिंकलेला आहे. त्यामुळे दिनेशकडून जर कर्णधारपद काढण्यात आले तर मॉर्गन हा केकेआरचा नवा कर्णधार असू शकतो.”

कार्तिकच्या नेतृत्वाखाली केकेआरच्या संघाला गेल्यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्याचबरोबर संघात दिनेश आणि अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसेल यांच्यामध्ये भांडण असल्याचेही पुढे आले होते. त्यामुळे या दोन्ही गोष्टींमुळे दिनेशचे कर्णधारपद धोक्यात असल्याचे म्हटले जात आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here